Dhule Municipal Corporation  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Code of Conduct : पदाधिकारी दालनांच्या भिंतींनाही मोकळा श्‍वास!

Dhule Lok Sabha Code of Conduct : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षांचे शहरातील झेंडे, बॅनर तर उतरविले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Code of Conduct : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षांचे शहरातील झेंडे, बॅनर तर उतरविले जात आहेत. दरम्यान, यानिमित्ताने धुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये नेत्यांच्या फोटोंनी फुल झालेल्या भिंतीही मोकळ्या झाल्या आहेत. सुमारे ५० फोटो काढल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता किमान आचारसंहिता लागू असेपर्यंत या भिंती मोकळ्या राहणार आहेत. (Dhule Lok Sabha Election code of conduct in Municipal Corporation about 50 photos of leaders removed from wall)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासकीय इमारतीमधील सर्व दालनांतील/सभागृहांतील राजकीय व्यक्तींचे फोटो/फलक काढणे, झाकण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासकीय इमारतीमधील विशेषतः पदाधिकाऱ्यांच्या दालनातील नेत्यांचे फोटो काढण्यात आले.

फोटोंनी भिंती होत्या फुल

महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सभागृह आदी ठिकाणी तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांचे फोटो लावण्याची प्रथा सुरू केली. पाच वर्षांत अनेक पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यामुळे नवीन पदाधिकारी खुर्चीवर विराजमान झाला की संबंधित पदाधिकारी आपल्यावर आशीर्वाद असणाऱ्या नेत्याचा फोटो आपल्या दालनात लावत होता.

माजी पदाधिकाऱ्याने लावलेले त्यांच्या नेत्यांचे फोटोही कायम राहायचे. त्यामुळे पाच वर्षांत महापौर, उपमहापौर, सभापती, सभागृह नेते आदी विविध पदाधिकाऱ्यांच्या दालनाच्या भिंती नेत्यांच्या फोटोंनी फुल झाल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळत होते.(latest marathi news)

त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची दालने म्हणजे त्यांच्या पक्षाची कार्यालयेच भासत होती. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पदाधिकाऱ्यांच्या दालनांच्या भिंतीवरील नेत्यांचे फोटो प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे या भिंती आता मोकळ्या झाल्या. सुमारे ५० फोटो काढल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली. त्यामुळे किमान आचारसंहिता लागू असेपर्यंत अर्थात किमान अडीच महिने या भिंती मोकळ्या राहणार आहेत.

बॅनर, झेंडे काढणे सुरूच

दरम्यान, राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, फलक काढणे, कोनशिला/कमानी झाकण्याची कार्यवाही महापालिका पथकाकडून सोमवारी (ता. १८) सलग तिसऱ्या दिवशीही सुरू होती. नेमके किती झेंडे, बॅनर काढले याची आकडेवारी मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळू शकली नाही. शहरातील बहुतांश भागातील राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, फलक काढण्यात आले अथवा ते झाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT