Railway esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Mumbai Railway : धुळे-मुंबई रेल्वे आता रोज; पुणे सेवेसाठी तत्त्वतः मान्यता

सकाळ वृत्तसेवा

Dhule Mumbai Railway : धुळे ते मुंबई (दादर) रेल्वे सुरू करण्यासाठी शिवसेनेने मार्चमध्ये आंदोलन केले. यानंतर ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस सुरू झाली. ही सेवा धुळेकरांना उपयुक्त ठरत असल्याने ती आठवडाभर नियमित करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य केली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांचे शिवसेना रेल कामगार सेनेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांसह आभार मानल्याची माहिती माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली. प्रा. पाटील म्हणाले, की रेल्वे अधिकाऱ्यांनी धुळे-पुणे रेल्वे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी तत्त्वत: मान्यताही प्रशासनाने दिली.

धुळे-दादर रेल्वे कोरोनाच्या संकटकाळापासून बंद पडली होती. दोन वर्षांच्या खंडानंतर ही सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने धुळे रेल्वेस्थानकावर आंदोलन केले होते. १ मेपासून आठवड्यातून तीन दिवस धुळे ते दादर रेल्वे सेवा सुरू झाली. ती ३० सप्टेंबरला बंद होणार होती.

या सेवेला उदंड प्रतिसाद पाहता धुळे-दादर रेल्वे नियमितपणे व्हावी, अशी मागणी मुंबईत चर्चेवेळी केल्यांनतर १ ऑक्टोबरपासून पूर्ण आठवडाभर ही सेवा दिली जाईल, असे आश्वासन मुख्य वाहतूक व्यवस्थापक शरत् चंद्रयान, मुख्य प्रधान अभिसरन, व्यवस्थापक एस. एस. गुप्ता यांनी दिली. त्यामुळे त्यांचा सत्कार केला.

तसेच धुळे ते पुणे व पुणे ते धुळे असे रोज दोन कोच चाळीसगावपासून महाराष्ट्र एक्स्प्रेसला जोडण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्त्वत: मान्य केल्याचे प्रा. पाटील यांनी पत्रकाद्वारे सांगितले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT