Municipal team while taking action on tax collection issue. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : घराला ‘सील’ ठोकत नळ कनेक्शनही केले बंद; करवसुलीप्रश्‍नी महापालिकेची कारवाई

Dhule Municipality News : महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे. जप्ती पथकाने स्वामिनारायण सोसायटीतील घर सील करीत गुरुवारी (ता. १५) नळ कनेक्शनही बंद केले. नागरिकांनी थकबाकीसह मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले. (Dhule municipal corporation took action to recover arrears)

मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाकडून मालमत्ता करवसुलीच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.

दोन दिवसांत पाचपेक्षा जास्त थकबाकीदारांची दुकाने सील करण्यात आली. स्वामिनारायण सोसायटीतील युवराज पीतांबर चौधरी यांच्या घराला सील लावण्यात आले. तसेच नळ कनेक्शन बंद करण्यात आले.

त्यांच्याकडे एक लाख ११ हजार ८३ रुपयांची थकबाकी आहे. ते थकबाकी भरण्याच्या नोटिसांना प्रतिसाद देत नव्हते.

त्यामुळे वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके, राजेंद्र गवळी, रवींद्र देवकर, जगदीश पांडे, संजय सैंदाणे, अशोक मंगीडकर, याकूब पठाण, हेमंत खैरनार, किशोर वाघ, किशोर बागूल, यतीन तेलंग, सचिन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT