Dhule News : धुळे जिल्ह्यातून 23 हजारांवर ना हरकती; मराठा आरक्षणाचा प्रश्‍न

Maratha reservation मराठा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेवर धुळे जिल्ह्यातून २३ हजारावर ना हरकती दाखल केल्या.
District Sakal Maratha Samaj office bearers while submitting objections to notification on Maratha reservation in Social Justice and Special Assistance Department.
District Sakal Maratha Samaj office bearers while submitting objections to notification on Maratha reservation in Social Justice and Special Assistance Department. esakal

Dhule News : मराठा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेवर धुळे जिल्ह्यातून २३ हजारावर ना हरकती दाखल केल्या. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई मंत्रालयात या ना हरकती दाखल केल्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha reservation) महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेतील क्रमांक दोनप्रमाणे हरकती, ना हरकती व सूचना मागविल्या होत्या.

त्यानुसार धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे धुळे जिल्ह्यातून मराठा समाजबांधवांसह इतर समाजांतील बंधू-भगिनी, विद्यार्थ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र स्वहस्ताक्षरात लिहून सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडे सुपूर्द केले. (Dhule Maratha reservation news)

या मोहिमेत सुमारे २३ हजार ७०४ ना हरकती प्राप्त झाल्या. या सर्व ना हरकती सकल मराठा समाजाचे समन्वयक विनोद जगताप, निंबाजी मराठे, सुनील पाटील, मुंबई सकल मराठा समाजाचे समन्वयक युवराज सूर्यवंशी यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे प्रत्यक्ष सादर केल्या. तशी पोचही घेण्यात आली.

महाराष्ट्रभरातून रांगा

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आंदोलन पुकारले. मुंबईत धडक मारून मराठा समाजाची एकजूट दाखविली.

दरम्यान, आरक्षणाच्या अधिसूचनेवर ना हरकत प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या प्रमाणपत्र नोंदणी मोहिमेला जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत विविध जाती-धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

District Sakal Maratha Samaj office bearers while submitting objections to notification on Maratha reservation in Social Justice and Special Assistance Department.
Dhule News : शिंदखेडा येथे आदिवासी मोर्चाला गालबोट; आरोपींना अटकेसाठी आंदोलक रस्त्यावर

त्यातून मोठ्या प्रमाणात नोंदणी करणे शक्य झाले, असे धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने म्हटले आहे. जिल्हाभरातून प्राप्त ना हरकती सामाजिक न्याय विभागास सादर करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. गेल्या दोन दिवसांपासून समन्वयक अर्जाची पडताळणी करत होते.

सामाजिक न्याय विभागात अर्ज सादर करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अर्जांची छाननी करून पडताळणी केली. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून सगेसोयरे या कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी.

यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या समाजबांधवांची मंत्रालयात अक्षरशः रांगा लावल्या. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनीदेखील ना हरकत प्रमाणपत्र दाखल करताना तारेवरची कसरत करावी लागली.

नोंदणी प्रमाणपत्र दाखल करतेवेळी मुंबई सकल मराठा समाजाचे समन्वयक युवराज सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

District Sakal Maratha Samaj office bearers while submitting objections to notification on Maratha reservation in Social Justice and Special Assistance Department.
Dhule News : शिंदखेडा येथील भाजी मंडईचा तिढा कायम; बैठकीत ठोस निर्णय नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com