Private police vehicle down the road. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचे वाहन उलटले

Dhule : एक कोटी ८१ लाख रुपयाची तांब्याची तार परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या ट्रकमालक व चालकासह तिघांना न्यायालयाने सोमवार (ता. ४)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : ट्रकचोरीची खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल करत ट्रकमधील सुमारे एक कोटी ८१ लाख रुपयाची तांब्याची तार परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या ट्रकमालक व चालकासह तिघांना न्यायालयाने सोमवार (ता. ४)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या प्रकरणी धुळे येथील एका आरोपीला ताब्यात घेऊन म्हसावद येथे परतणाऱ्या पोलिसांचे वाहन उलटल्याने केवळ नशीब बलवत्तर म्हणून उपनिरीक्षकासह चारही पोलिस कर्मचारी सुदैवाने वाचले, अशी माहिती उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी दिली. (Dhule police vehicle carrying accused overturned)

२७ फेब्रुवारीला खेडदिगर (ता. शहादा) येथील रस्त्यावर उभा असलेला ट्रक चोरट्यांनी नेल्याची फिर्याद ट्रकमालकाने दिल्यानंतर याचा तपास करण्यासाठी उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलिस शिपाई अजित गावित, प्रवीण पवार, राकेश पावरा.

जितू पाडवी यांच्या पथकाने संपूर्ण परिसरात तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज व ट्रकला लावलेली जीपीएस यंत्रणा तसेच ट्रकचालक व मालकाच्या कॉलरेकॉर्डवरून ट्रक हा धुळे येथे स्क्रॅप करण्यासाठी भंगारवाल्याकडे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांचे पथक धुळे येथे २८ फेब्रुवारीला पोचल्यानंतर तेथून त्यांनी मोहम्मद नुमान हमीद शहा याच्या ताब्यात ट्रक मिळून आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक करून म्हसावद येथे आणले. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला ट्रक व संशयित आरोपी मोहम्मद नुमान हमीद शहा यांना म्हसावद येथे आणत असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील सावळदा फाट्यानजीक उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व पोलिस कर्मचारी असलेले खासगी वाहन अचानक रस्त्यावरून सुमारे शंभर मीटर अंतरावर खाली उतरले व अपघात झाला. (latest marathi news)

सुदैवाने वाहन रस्त्याच्या खाली येत असताना मोठी दुर्घटना घडली नाही अन्यथा वाहनातील चारही कर्मचाऱ्यांसोबत मोठी दुर्घटना घडली असती. या सर्वांचे नशीब बलवत्तर म्हणून कोणाला काहीही दुखापत झाली नाही.

गेल्या ७२ तासांपासून सातत्याने जागरण व तपास यामुळे कर्मचाऱ्यांची अपूर्ण झोप व मानसिक ताण असल्याने पोलिस कर्मचारी झोपेत असताना हा अपघात घडला. परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघात घडला त्या वेळी आम्ही साक्षात मृत्यूला पाहिले, अशी प्रतिक्रिया पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली.

पोलिसांचे कौतुक

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच म्हसावद पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीचा चोरीला गेलेला ट्रक तसेच सुमारे एक कोटी ८१ लाख किमतीची तांब्याची तार असा एकूण एक कोटी ८९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याने म्हसावद पोलिसांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT