Bunches of harvested bananas in the field were uprooted.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Unseasonal Rain : दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस; काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule Unseasonal Rain : शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गुरुवारी (ता. ६) व शुक्रवारी (ता. ७) झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा, ज्वारी, दादर, पपई, केळी व चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Dhule Unseasonal Rain Damage to harvested crops news)

तसेच शेताच्या बांधावरील व रस्त्यावरील लागून असलेली दुतर्फा झाडे वादळामुळे उन्मळून पडली. शिंदखेडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या चिमठाणे, शिंदखेडा व वर्षी महसूल मंडळांत १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शुक्रवारी (ता. ७) शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा, वरूळ-घुसरे, परसामळ, भडणे, हातनूर, अलाणे, दरखेडा, चिमठाणे, साळवे, दलवाडे (प्र. सोनगीर) वर्शी आदी परिसरात सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यात अचानक मोठ्या प्रमाणात वादळ सुरू होऊन विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाला सुरवात झाली.

त्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, मका, कांदा, दादर, रब्बी ज्वारी कापणीला व काहींची काढणी सुरू होती. त्यात अचानक आलेल्या वादळाने व पावसाने शेतकऱ्यांसह मजुरांची तारांबळ उडाली. वादळामुळे केळी व पपईचे झाड उन्मळून पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शिंदखेडा तहसील मंडळातील शनिवारी (ता. ८) सकाळी सातपर्यंत झालेला पाऊस, त्यात शिंदखेडा मंडळ सहा मिलिमीटर, चिमठाणे मंडळ पाच मिलिमीटर व वर्शी मंडळ चार मिलिमीटर अशी एकूण १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तालुक्यात १५ दिवसांपूर्वी अवकाळी व वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. मात्र त्या वेळीही पंचनामे झाले नाहीत. आता तरी महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT