esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Loksabha Election : नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकणारच; काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Loksabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिलला राहिला आहे. झालेल्या चुका दुरुस्त करीत आता पुन्हा काँग्रेसने निश्‍चय केला आहे. मित्रपक्षांसह नंदुरबार लोकसभा निवडणूक काँग्रेस जिंकणारच, असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (Former Congress minister Vasant Purke claims that congress will win Lok Sabha elections Nandurbar news)

काँग्रेसने लोकसभानिहाय निरीक्षकांचे दौरे सुरू केले आहेत. शनिवारी (ता. १२) श्री. पुरके, नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख राजाराम पानगव्हाणे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठीची प्राथमिक चर्चा व इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली.

श्री. पुरके म्हणाले, की नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे मागील चुका दुरुस्त करीत आगामी निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या पुन्हा ताब्यात घेईलच.

तसे नियोजन पक्षीय स्तरावर सुरू आहे. इच्छुक उमेदवारही निवडून येणारेच आहेत. त्यामुळे पक्षाने नंदुरबार लोकसभामतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. जवळपास सहा जणांच्या नावांची चर्चा झाली आहे. दिवंगत इंदिरा गांधींपासून नंदुरबार काँग्रेसकडे होते. आताही प्रचार प्रारंभ नंदुरबारपासूनच होईल, असे नियोजन वरिष्ठांना सांगू.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ते म्हणाले, की देशात एकहुकमी सत्ता सुरू आहे. पंतप्रधान विदेश दौरे करण्यात मश्‍गुल आहेत. मणिपूरसारखी घटना दुर्दैवी आहे. तेथे सत्ताधारी पोचले नाहीत. काँग्रेसचे नेते जातात, तर जाऊ दिले जात नाही. संसदेत बोलणाऱ्यांना निलंबित केले जाते.

कोरोनाकाळ व नोटबंदीत कित्येक लोकांचा जीव गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे शासन घाला घालत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांना साथ मिळेल. नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळणारच यात शंका नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा संपर्कप्रमुख राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार शिरीष नाईक, सहनिरीक्षक रणजित पावरा, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, माजी आमदार वंसत सूर्यवंशी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Vidarbha FDA Raids : वर्ध्यात ‘पतंजली’ सुपर मार्टवर छापा, तर यवतमाळमध्ये पान टपऱ्यांवर कारवाई; विदर्भात FDA ची धडक मोहीम

Nasrapur Crime Case : नसरापूर खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर; न्यायालयात एकाच दिवशी दहा साक्षीदारांची साक्ष

Bhandara Crime : "प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग मित्रांना बोलावून बेडरूममध्ये...''; अल्पवयीन तरुणीसोबत भयानक घडलं; पाच जणांना अटक

Pune News : पुणे जिल्ह्यातील आठ धरणांची होणार सुरक्षा तपासणी

SCROLL FOR NEXT