Shriram Patil, Dr. Shobha Bachhav  esakal
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha Election : महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर! रावेरला श्रीराम पाटील, तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव

Jalgaon News : महाविकास आघाडीकडून बुधवारी (ता. १०) रावेर, धुळे लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव / मालेगाव : महाविकास आघाडीकडून बुधवारी (ता. १०) रावेर, धुळे लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्‍ट्रवादी शरद पवार पक्षाकडून श्रीराम पाटील, तर धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षातर्फे उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. (Jalgaon Lok Sabha Election)

पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीतील राज्यातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षातर्फे पुणे येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत श्रीराम पाटील यांच्या नावावर एकमत झाले होते. आज पक्षातर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली.

खडसे विरुद्ध पाटील

रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता दोघांत सामना होणार आहे. खासदार रक्षा खडसे या दोन वेळा या मतदार संघातून विजयी झाल्या आहेत, त्या तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रीक करणार की श्रीराम पाटील यावेळी विजयाची बाजी मारणार याकडेच प्रामुख्याने लक्ष असणार आहे.

धुळ्यात काँग्रेसतर्फे डॉ. शोभा बच्छाव

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा आता सुटला आहे. काँग्रेसतर्फे माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारीची बुधवारी (ता. १०) अधिकृत घोषणा करण्यात आली. डॉ. बच्छाव यांची उमेदवारी निश्चित झाल्याने आता या मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे अशी दोन डॉक्टरांमध्ये लढत होणार आहे. (latest marathi news)

गेल्या दोन आठवड्यांत रोज नवनवीन नावे चर्चेत येत होती. उमेदवारीबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर डॉ. बच्छाव यांनी बुधवारी मालेगाव व परिसरातील काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आता या मतदारसंघात तुल्यबळ लढत होईल.

डॉ. बच्छाव यांची कर्मभूमी नाशिक

डॉ. दिनेश व डॉ. शोभा बच्छाव हे दांपत्य नाशिकमध्ये साडेतीन दशकांपासून वैद्यकीय सेवा करीत आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास असून, काँग्रेसच्या निष्ठावंत म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यांचे सासर मालेगाव तालुक्यातील सोनज येथील आहे.

इच्छुक डॉ. तुषार शेवाळे व श्याम सनेर यांना डावलून ही उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना विश्वासात घेऊन प्रचारात तारेवरची कसरत बच्छाव यांना करावी लागणार आहे. कमी कालावधीत मतदारसंघ पिंजून काढणे हे त्यांच्या समोर आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT