subhashsingh jamdar offer to eknath shinde esakal
उत्तर महाराष्ट्र

‘शिंदेसाहेब, आमच्या पक्षात सामील व्हा’; मानव एकता पक्षाची खुल्ली ऑफर!

सचिन पाटील.

शिरपूर (जि. धुळे) : शिंदेसाहेब, आपल्याला शिवसेनेचा (Shiv sena) वेगळा गट स्थापन करता येणार नाही असे कळते. म्हणून कोणताही संकोच न बाळगता आमच्या पक्षात सामील व्हा असा प्रस्ताव येथील मानव एकता पक्षाने शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. (Manav Ekta paksha open offer to eknath shinde dhule news)

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषसिंह जमादार यांनी रविवारी (ता.26) प्रस्तावाचे पत्र शिंदे यांच्याकडे रवाना केले. जमादार यांनी सांगितल्यानुसार, मानव एकता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथे झाली. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होऊन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यानंतर शिंदे यांना प्रस्तावाचे पत्र रवाना करण्यात आले.

‘आपल्या बंडामागील भूमिका मान्य आहे. आपण सरकार कोसळवण्याइतपत सक्षम आहात. मात्र सद्यस्थितीत आपल्याला शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करता येणार नाही. मानव एकता पक्ष आपला समविचारी असून आपल्या समर्थक आमदारांसह त्यात प्रवेश करावा असे पक्षाध्यक्ष जमादार यांनी म्हटले आहे.

"२०११ पासून आमच्या पक्षाची मान्यता आहे. जनतेच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत. एकनाथ शिंदे यांची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन त्यांना प्रस्ताव दिला आहे."

- सुभाषसिंह जमादार, संस्थापक अध्यक्ष, मानव एकता पक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT