Dhule Municipal Corporation 
उत्तर महाराष्ट्र

धुळे मनपाः चीत भी मेरी..पट भी मेरी; वॉटरग्रेसला पुन्हा अभय

सर्व गोंधळात कचरा संकलनाचे काम तूर्त तरी वॉटरग्रेस कंपनीकडूनच सुरू राहील असे अधोरेखित झाले.

सकाळ वृत्तसेवा


धुळे ः शहरातील कचरा संकलनप्रश्‍नी मागील महापालिका (Dhule Municipal Corporation) सभेत स्थायी समितीने (Standing Committee) वादग्रस्त वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या संस्थेचे काम बंद करून पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाचे स्वागतही झाले. मात्र, स्थायी समितीचा हा निर्णय या वेळीदेखील फुसका बार निघाला. कचरा संकलनप्रश्‍नी विरोधी सदस्य गंभीर स्थिती मांडत असताना सत्ताधाऱ्यांकडून आदळआपट केली गेली. स्वतः भूमिका मांडताना मात्र गंभीर स्थितीसह वॉटरग्रेसचे वाभाडे काढले. त्यामुळे या प्रश्‍नावर सत्ताधारी भाजप (BJP) गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले.


महापालिकेत स्थायी समितीची ऑनलाइन सभा झाली. सभापती संजय जाधव, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य (ऑनलाइन, ऑफलाइन) उपस्थित होते. नेहमीप्रमाणे कचरा संकलनाचा प्रश्‍न सभेत उपस्थित झाला. समाजवादी पक्षाचे सदस्य अमीन पटेल यांनी कचऱ्याप्रश्‍नी काहीही मार्ग न निघाल्याने सभागृहात ठिय्या मांडत निषेध नोंदविला. श्री. पटेल यांच्या या कृतीला सत्ताधारी भाजपचे सदस्य सुनील बैसाणे, शीतल नवले यांनी विरोध दर्शवत ही स्टंटबाजी, नौटंकी असल्याचा आरोप केला. खुद्द सभापती जाधव यांचेही सूर बदललेले पाहायला मिळाले. त्यांनी या प्रश्‍नावर कधी आयुक्त, आरोग्याधिकाऱ्यांसमोर अशी आंदोलने केली का, असा उलट प्रश्‍न श्री. पटेल यांना केला.


सत्ताधाऱ्यांची आदळआपट
श्री. पटेल बोलत असताना सत्ताधारी भाजपचे सदस्य बैसाणे, नवले यांनी श्री. पटेल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तुमच्यात हिंमत असेल तर शहर आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून दाखवा, आमदारांचा निषेध करा, असे आव्हान श्री. बैसाणे यांनी श्री. पटेल यांना दिले, तर कचरा ठेक्याची वर्कऑर्डर कोणत्या नियमाखाली द्यायला सांगता, असा प्रश्‍न श्री. नवले यांनी केला. स्थगिती उठविण्यासाठी सर्व नगरसेवक मंत्रालयात आंदोलन करतील, असे सदस्य नागसेन बोरसे म्हणाले. श्री. पटेल यांनी स्टंटबाजीचे आरोप चुकीचे असून, मी नाटक करत असेन तर मला निलंबित करा, असे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. श्री. पटेल यांना विरोध करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीच नंतर वॉटरग्रेस व अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले.


वॉटरग्रेसला अभय, बिलही अदा
या सर्व गोंधळात कचरा संकलनाचे काम तूर्त तरी वॉटरग्रेस कंपनीकडूनच सुरू राहील असे अधोरेखित झाले, त्यासाठी कंपनीचे एक महिन्याचे बिलही अदा करण्याची कार्यवाही झाली आहे. सणासुदीचे दिवस असल्याचे कारणही त्यासाठी पुढे केले गेले. दरम्यान, कामात सुधारणा करू, नवीन कंत्राटदाराला काम देण्याबाबत शासनाची स्थगिती उठविण्यासाठी पुन्हा मंत्रालयात जाऊ, असे आयुक्त टेकाळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT