heavy rain sakal
उत्तर महाराष्ट्र

पिंपळनेर परिसरात पावसाचे जोरदार आगमन

पिंपळनेर परिसरात पावसाचे जोरदार आगमन

सकाळ डिजिटल टीम

पिंपळनेर (धुळे) : शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी (Heavy rain) लागली. पिंपळनेर शहरासह पश्‍चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये मान्सूनपूर्व पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) देखील उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा लागून आहे. तरी देखील पेरणीच्या कामांची लगबग काही ठिकाणी सुरू झाल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. (dhule-pimpalner-aria-heavy-rain-today)

गेल्या तीन दिवसांपासून पिंपळनेरमध्ये अधून- मधून पावसाच्या सरी कोसळत असून रविवारी दुपारी पिंपळनेर परिसरासह पश्चिम पट्ट्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी शहरासह पश्चिम पट्ट्यातील अनेक भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. जवळपास तासभर झालेल्या पावसाने शहरातील कॉलनीसह नवीन वसाहत भागांमध्ये पाणी साचल्याचही चित्र बघायला मिळत होतं.

उत्‍साह अन्‌ नुकसानही

मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पिंपळनेरकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे याच पावसामुळे कांद्यासह ईतर पिकांना फटका बसण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाळी पिके घेण्यासाठी शेती मशागतीस सुरुवात केली आहे.

दिवसभर ढगाळ वातावरण

दुपारच्यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासूनच ढगाळ वातवरण असल्‍याने पावसाची शक्‍यता निर्माण झाली होती. पाऊस पडल्‍यानंतर काही वेळ ढगाळ वातावरण राहिल्‍यानंतर सुर्याने दर्शन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT