dhule corporation
dhule corporationsakal

झुलत्या पुलावर टवाळखोरांचा उच्छाद

झुलत्या पुलावर टवाळखोरांचा उच्छाद
Published on

धुळे : शहरातील गणपती मंदिराजवळील पांझरा नदीत झुलत्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी श्री भगवान महादेवाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ असल्याने काही महिला, तरुणी तसेच बालक येथे येतात. मात्र, आता त्याचा गैरफायदा टवाळखोर घेत आहेत. टवाळखोरांनी उच्छाद मांडला असून, ते महिला व तरुणींची छेड काढतात. त्यामुळे येथील पावित्र्य नष्ट होत आहे. (dhule-maratha-mahasangh-later-mayor-zulta-bridge)

dhule corporation
बिबट्याचा हल्‍ला..डोंगरावर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही लावून सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी मराठा महासंघाने महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, शहराध्यक्ष विक्रमसिंह काळे, धुळे तालुकाध्यक्ष रमेश मराठे, बाजीराव खैरनार, कांतिलाल देवरे, मिलिंद पाटील, पवन शिंदे, आशिष देशमुख, सुरेश सूर्यवंशी, सुनील ठाणगे, सतीश गिरमकर, संजय नेतकर, राजेंद्र मराठे, उमेश पवार, साहेबराव पाटील यांच्या निवेदनाचा आशय असा ः पांझरा नदीवरील झुलत्या पुलावर श्री भगवान महादेव मूर्तीचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. येथे सर्वधर्मीय भाविक येतात. मात्र, त्या ठिकाणी टवाळखोरांचा त्रास वाढला आहे. ते पान, गुटखा खाऊन तेथेच थुंकतात व घाण करतात. तसेच मुलींची छेड काढणे, अश्लील शब्द वापरून तेथील वातावरण बिघडविण्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. कोणी धूम्रपान करू नये, असे फलकही लावणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षकांची नियुक्ती करून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा. याबरोबरच पुलाखाली उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com