mother 
उत्तर महाराष्ट्र

नशिबाने मारले अन् देवाने तारले..महिलेची प्रवेशद्वारावरच प्रसूती

तऱ्हाडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या गेटजवळ येताच डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आवाज दिला.

महेंद्र खोंडे

तऱ्हाडी : सकाळची वेळ गावातील शेतकरी (Farmer) , शेतमजूर पोटापाण्यासाठी कुणी मजुरी तर कुणी शेताच्या कामाला गेलेले असताना दिवसभर थकून आल्यानंतर रात्रीची गाढ झोप. त्यातही पहाटेची साखर झोप, अशावेळी ममाणे, (ता. शिरपूर) येथील सपनाबाई दशरथ पारधी या गरोदर मातेला (Pregnant mother)अचानक प्रसूती (Maternity) वेदना सुरु झाल्या. तिला सासूबाई लताबाई दलाल पारधी व सरलाबाई पारधी यांनी पहाटे पाचला बाळंतपणासाठी जवळच्याच तऱ्हाडी आरोग्य उपकेंद्रात (Health Subcentre) दाखल करण्यासाठी आणले.

मात्र प्रवेशद्वाराजवळ आणताच प्रसूती वेदना असह्य होऊ लागल्याने तेथूनच सोबत आलेल्या महिलांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना जोरजोरात आवाज दिला. परंतु आरोग्य केंद्रातून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ज्याला नाही सहारा तो देवाला प्यारा याप्रमाणे गेट जवळच तिने एका बाळाला जन्म दिला. यामुळे नशिबाने मारले अन देवाने तारल्याचा अनुभव सर्वांनी घेतला.


पारधी या दांपत्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते काम व त्यातून मिळणारी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी (ता.२२) पहाटे ५ च्या दरम्यान सपनाबाई दशरथ पारधीला प्रसूती वेदना जाणवू लागल्याने सासू लताबाई यांचे सूनबाईच्या वेदना पाहून हृदय पिळवत होते. सूनबाईची प्रसूती सुखरूप व्हावी म्हणून जिवाचे रान करून त्यांनी तऱ्हाडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या गेटजवळ येताच डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आवाज दिला. परंतु अपूर्ण कर्मचारी रात्रीच्या वेळेस तर दोनच कर्मचारी त्यांच्यापर्यंत आवाज पोचला नाही. यामुळे अखेर या गरीब महिलेला गेटवरच आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. सकाळी बाळ व बाळंतीणीची प्रकृती उत्तम असल्याचे तऱ्हाडी येथील खासगी डॉक्टरांनी सांगितले.

मुख्यालयी न राहण्याबाबत नोटिसा देण्यात येतील. वांरवार तक्रारी आल्याने कायदेशीर कारवाई करणार आहे.
-डॉ. प्रताप पवार, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT