बनावट अर्भके आली भंगारात..आणि गटारीत दिसताच यंत्रणेची धावपळ

पन्नालाल वखारीजवळ दोन मानवी अर्भके सापडली असून, तीन-चार कुत्र्यांनी पळविल्याचे फोटो व्हॉट्स‌ॲपवर व्हायरल झाली.
crime
crime
Updated on


जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर (National Highways) पन्नालाल वखारीशेजारी गटारीजवळ फेकलेली पाच-सहा मानवी अर्भके (Infants) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मोकाट कुत्र्यांनी काही पळवली, तर घटनास्थळावर पोलिस (Police) दाखल झाल्यानंतर पंचनामा करून ताब्यात घेताना ही अर्भके प्लॅस्टिकची असल्याचे निष्पन्न झाल्याने यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला.

crime
जळगाव जिल्हा बँक बिनविरोधसाठी महाजन तयार


तांबापुऱ्यातील पन्नालाल वखारीजवळ गटारीच्या कोपऱ्यावर मोकाट कुत्रा मानवी अर्भक पळविताना दिसला. उकिरड्यावर तशीच चार-पाच अर्भके आढळून आल्याची चर्चा पसरल्यावर एकच गर्दी उसळली. तांबापुऱ्यासह परिसरातील रहिवासी, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती कळाल्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी घटनास्थळी धडकले. तोपर्यंत मोकाट कुत्र्यांनी तीन-चार अर्भके पळविली होती. उर्वरित दोन अर्भकांचा पंचनामा करून ती ताब्यात घेताना अर्भक प्लॅस्टिकची असल्याचे आढळले. मानवी बाळ नसून ते, प्लॅस्टिकचे असल्याचे पोलिसांनी सांगताच गर्दीत एकच हशा पिकला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली होती.

व्हॉट्स‌ॲप व्हायरल

पन्नालाल वखारीजवळ दोन मानवी अर्भके सापडली असून, तीन-चार कुत्र्यांनी पळविल्याचे फोटो व्हॉट्स‌ॲपवर व्हायरल झाली. वेगवेगळ्या ग्रुपवर ही माहिती पसरल्याने पोलिस यंत्रणेसह आरोग्य विभागाचीही धावपळ सुरू झाली.

crime
जळगावात शिवसैनिकांनी डुक्‍करांच्या गळ्यात बांधल्‍या राणेंच्या प्रतिमा


भंगारात आली अर्भके...
प्रयोगशाळेत काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवतात तशा पद्धतीने पाच-सहा अर्भके भंगारवाल्याकडे आली होती. मात्र, ते बघून तोही घाबरला. त्याने ती कचऱ्यात फेकून दिल्याचे तांबापुऱ्यातील भंगार व्यावसायिक रईस खाटीक याने पोलिसांना माहिती देताना सांगितले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. आचार्य यांच्यासह शहरातील बहुतांश हॉस्पिटलचे भंगार घेत असल्याचे तो चौकशीदरम्यान सांगत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com