reshan kard 
उत्तर महाराष्ट्र

युनिट रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या "केशरीं'नाच धान्य 

देविदास वाणी

जळगाव:  कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अशा काळात शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांवरील माल आल्याची माहिती देणे, प्रत्येक शिधापत्रिकेवर प्रतिसदस्य किती धान्य मिळेल याची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आता जिल्ह्यातील काही माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवकांची नियुक्ती जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. ज्या केशरी शिधापत्रिकाधारकांची नोंद तहसील कार्यालयातील युनिट रजिस्टरमध्ये आहे त्यांनाच मे व जूनमध्ये धान्य मिळणार आहे. ज्यांची नोंद नसेल त्यांना धान्य मिळणार नसून, ते बोगस म्हणून समजले जाणार आहेत. 

राज्य शासनाने केशरी शिधापत्रिकाधारकांनाही प्रतिसदस्य पाच किलो धान्य देण्याचे नियोजन केले आहे. येत्या मे व जूनमध्ये एक ते दहा तारखेदरम्यान फक्त याच लाभार्थ्यांना हे धान्य मिळेल. मात्र, या केशरी शिधापत्रिकाधारकांची नोंद तहसील कार्यालयातील युनिट रजिस्टरमध्ये झालेली असणे गरजेचे आहे. त्याबाबत संबंधित तहसीलदार दुकानदारांना संबंधित शिधापत्रिकाधारकांची नावे देतील. यामुळे ज्यांची नोंद असेल त्यांनाच दुकानदार धान्य देईल. इतरांना देणार नाही. कारण, त्याची नोंदच झालेली नसेल. अशा शिधापत्रिका बोगस असतील, ते यानिमित्ताने समोर येतील. अशांवर यावेळी मात्र कारवाई करण्यात येणार आहे. 

सर्वच प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या वाट्याचे धान्य मिळावे यासाठी त्याबाबतची माहिती लाभार्थ्यांना देण्यासाठी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांची नियुक्ती केली आहे. हे धान्य वाटपाबाबत माहिती देऊन, कोणाच्या वाट्याला किती धान्य आहे, हे सांगतील. स्वस्त धान्य दुकानात "सोशल डिस्टन्सिंग' पाळले जाते किंवा नाही, याबाबत लक्ष ठेवतील. याअनुषंगाने स्वस्त धान्य दुकानदारावर एकप्रकारचा धाकही राहील व तो धान्याचे योग्य प्रमाणात वाटप करेल. 

"केशरी'चे 13 लाख लाभार्थी 
जिल्ह्यात सध्या धान्य मिळत नसलेले तीन लाख 12 हजार 649 केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यात 13 लाख 47 हजार 830 सभासदांना प्रत्येकी पाच किलो धान्य (तीन किलो गहू; आठ रुपये दर), दोन किलो तांदूळ (12 रुपये दर) मिळेल. सकाळी सात ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री 10 अशा वेळेत धान्यवाटप होईल. 

असे मिळणार धान्य 
1 ते 10 तारखेदरम्यान ः फक्त केशरी शिधापत्रिकाधारकांना 
11 ते 20 तारखेदरम्यान ः फक्त प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कार्डधारक 21 ते 30 तारखेदरम्यान ः पाच किलो तांदूळ मोफत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT