Devendra Fadnavis 
उत्तर महाराष्ट्र

वजन जास्त झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

सकाळवृत्तसेवा

नाशिक : लातूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्‍यात बचावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे शनिवारी सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हेलिकॉप्टर उतरविण्यात आले, अशी जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे खानसामा सतीश काणेकर यांना हेलिकॉप्टरमधून उतरविल्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना झाले. 

नंदुरबार येथील चेतक महोत्सवास हजेरी लावल्यानंतर काल (ता.8) रात्री मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृह येथे मुक्‍कामी थांबले होते. तेथून आज सकाळी औरंगाबादकडे जाण्यासाठी रवाना होत असताना हा प्रकार घडला.

नाशिक दौरा संपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विविध खात्यांचे सचिव असे अन्य तिघेजण औरंगाबादकडे निघाले होते. हेलिकॉप्टर उड्डाण करीत असताना वजन जास्त झाल्याचे लक्षात आल्याने ते तातडीने उतरविण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे खानसामा सतीश काणेकर यांना उतरवल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले. या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन आणि स्वीय सचिव औरंगाबादला पोचले. 

यापूर्वी लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातातून ते थोडक्‍यात बचावले होते. रायगडमध्येही हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड लक्षात आला होता. हेलिकॉप्टरच्या बाबतीत वारंवार अशा घटना घडत असताना सुरक्षेच्या बाबतीत इतक्‍या त्रुटी का ठेवल्या जातात, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT