municipal commissioner warned legal action would be taken if pigs were not moved outside by March 19
municipal commissioner warned legal action would be taken if pigs were not moved outside by March 19 esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महापालिकेकडून डुक्करमालकांना सूचना; मोकाट डुकरे मनपा हद्दीबाहेर हलवा अन्यथा....

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांच्या (Pigs) उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्य व मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर डुक्करमालकांना जाहीर नोटीस, तसेच वैयक्तिक स्वरूपातही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (municipal commissioner warned legal action would be taken if pigs were not moved outside by March 19 dhule news)

संबंधितांनी १९ मार्चपर्यंत डुकरे महापालिका हद्दीबाहेर न हलविल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

शहरात मोकाट जनावरांचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून कायम आहे. मोकाट गुरे, मोकाट कुत्र्यांची समस्या महापालिकेला अद्याप सोडविता आलेली नाही. दरम्यान, आता शहरातील विविध भागांत मोकाट फिरणाऱ्या डुकरांबाबत महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

धुळे महापालिका हद्दीतील काही व्यक्ती डुकरांचे पालन व्यावसायिक हेतूने करत असून, त्यांनी डुकरे मोकाट सोडली आहेत. अशा भटक्या व मोकाट डुकरांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा व साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय सनेर यांनी गुरुवारी (ता. १६) महापालिकेत संबंधित डुक्कर मालकांची बैठक घेतली.

आरोग्य विभागप्रमुख व सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. शहरात फिरणाऱ्या डुकरांमुळे होणारा त्रास व आरोग्याच्या प्रश्‍नाबाबत संबंधितांना बैठकीत माहिती देण्यात आली. १९ मार्च २०२३ पर्यंत शहरातील मोकाट डुकरे काढून घेण्याबाबत डुक्करमालकांना समज देण्यात आली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

...अन्यथा गुन्हा

यापूर्वी संबंधित डुक्करमालकांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत जाहीर नोटिस व वैयक्तिक नोटिसा देण्यात आली आहे. रविवार (ता. १९ मार्च)पर्यंत मालकीची डुकरे धुळे महापालिका हद्दीबाहेर न हलविल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे, त्याप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

सोपस्कार तर नाही?

शहरात मोकाट जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या नवीन नाहीत. मोकाट गुरे, मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत अनेकदा तक्रारी झाल्या. या तक्रारीनंतर महापालिकेने मोकाट गुरांप्रश्‍नी मध्यंतरी कारवाईदेखील सुरू केली. त्यानंतर मात्र स्थिती ‘जैसे थे’ झाली. मोकाट कुत्र्यांची समस्या तर कधी सुटेल हे कुणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे.

त्यात आता मोकाट डुकरांच्या समस्येवर महापालिकेकडून कार्यवाही सुरू झाली आहे. ही कार्यवाही खरंच समस्या सोडविण्यासाठी आहे, की स्वच्छ सर्वेक्षण अथवा इतर अभियानात गुणांकन मिळविण्यासाठी होणारा सोपस्कार आहे यावरच या समस्येचेही भवितव्य ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

India Lok Sabha Election Results Live : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे ऑफिस फुलांनी सजले

Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 4 जून 2024

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात; पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली

SCROLL FOR NEXT