Military-jet-plane-sonic-boom. 
उत्तर महाराष्ट्र

तो...आवाज सुपरसॉनिक सुखोईचा ! 

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार ः नंदुरबारमध्ये तिन तासा पूर्वी झालेल्या मोठ्या आवाजाबाबत विमान पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. यावरून "सकाळ' ने सत्याची पडताळणी केली असता एटीसी मुंबई व हिंदुस्थान एरोनॉटिकल नाशिक येथून माहिती घेतली सुपरसॉनिक बुम फायटर जेट सुखोई विमान पुणे येथून पुणे नाशिक व नाशिक एचएएलच्या अंडर च्या फ्लाइंग एरिया मध्ये प्रॅक्‍टिससाठी होते. 

नंदुरबार हा भाग नाशिक एचएएल चे फ्लाईंग एरीयामध्ये येतो. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरात अचानक मोठ्याने आवाज झाले. आवाजाची तिव्रता मोठी असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. तसेच काही घरांच्या काचा देखील अवाजाने फुटल्या होत्या. तसेच विमान पडल्याची अफवांना देखील उत आला होता. परंतू याबाबत सकाळने आवाजा बाबत नाशिक येथून माहिती घेतली असता सदर विमान सुखरूप परत पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे विमान कमी उंचीवरुन उडत असल्यास सुपरसानिक बुम या सराव प्रकारात अशा प्रकारे प्रचंड मोठा आवाज होतो. अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

Ganja Seized : माथनी टोल प्लाझावर २.६१ कोटींचा गांजा जप्त; डीआरआयची कारवाई, दोघांना अटक, आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

Dr. Neelam Gorhe : वृक्षतोड न करता गणेशखिंड रस्त्याचे रुंदीकरण करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Mumbai News : केबल चोरीच्या प्रयत्नाने सिग्नल यंत्रणा ठप्प; पनवेल-वाशी मार्गावरील लोकल सेवा दोन तास विस्कळित; सायंकाळच्या गर्दीत हजारो प्रवासी अडकले

Oil India Andaman Gas: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडलं ऊर्जेचं भांडार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT