नगरसेवकपदी शिवसेनेच्या निता सोनवणे बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

जळगाव महापालिकेतील प्रभाग क्र 19 (अ) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या निता सोनवणे यांची बिनविरोध निवड आज घोषणा करण्यात आली.

जळगाव ः जळगाव महापालिकेतील प्रभाग क्र 19 (अ) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या निता सोनवणे यांची बिनविरोध निवड आज घोषणा करण्यात आली. निवडणूकीत दोन अर्ज आले होते यात अपक्ष उमेदवार आशा कोळी यांनी माघार घेतल्याने सोनवणेंची बिनवीरोध निवड झाली. 

विधानसभेच्या निवडणूकीत प्रभाग क्रमांक 19 "अ' मधील शिवसेनेच्या नगरसेविका लता सोनवणे या चोपडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे त्यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली होती. यात शिवसेनेच्या निता सोनवणे आणि अपक्ष म्हणून आशा कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आशा कोळी यांनी माघार घेतल्याने निता सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीची 
घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली. दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेविका निता सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे विरोधीपक्षनेते सुनील महाजन, शहरमहानगर प्रमुख शरद तायडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news shivsena nagrsevika nita sonaw unopposed jmc Bye-election