corona positive esakal
नाशिक

नाशिक : KBH महाविद्यालयातील आणखी 10 मुलींचे स्वॅब पॉझिटिव्ह

विक्रांत मते

नाशिक : पंचवटीतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तब्बल २७ विद्यार्थीनींना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी नव्याने दहा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.

महाविद्यालय कोरोना हॉटस्पॉट

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. सद्य स्थितीत शहरात ६९२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यात महापालिका हद्दीतील ४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी (ता. २) पंचवटीतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात १७ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. वैद्यकीय विभागाने वसतीगृहातील ८४ मुलींसह कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले. सोमवारी (ता. ३) १० मुलींचे अहवाल वैद्यकीय विभागाला प्राप्त झाले त्यात सर्व अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा २७ पर्यंत पोहोचला आहे. वसतीगृहातील मुलांचेही स्वॅब घेतले जात आहे. वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजिता साळुखें यांनी दिली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत सर्व अहवाल प्राप्त होतील.

दंत महाविद्यालय कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय विभागाचे पथक या भागात तैनात करण्यात आले आहे. ज्या मुलींमध्ये कोरोनाची तीव्र स्वरुपाची लक्षणे नाही त्यांना वसतीगृहात अलगिकरणात ठेवले आहे. स्वतंत्र वाहन असेल अशा विद्यार्थिनीनांच घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहनातून विद्यार्थ्यांना घरी सोडले जाणार नाही. अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT