Sunthwal Wada collapsed on the main road in Karanja area on Monday Sunday esakal
नाशिक

Nashik : 7 दिवसात अकरा वाडे कोसळण्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दरवर्षी पावसाळ्यात जुने धोकादायक वाडे कोसळण्याच्या (Old wada collapse) घटना घडत असतात. यंदादेखील गेल्या सात दिवसात दहा वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही.

परंतु, बुरूड गल्ली येथील वाडा कोसळण्याच्या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. १८) झालेल्या पावसाने वाडे कोसळण्याच्या घटनेस पुन्हा सुरवात झाली आहे. सायंकाळी रविवार कारंजा येथील सुंठवाल वाडा कोसळण्याची घटना घडली. (11 old wada collapsed in 7 days nashik monsoon Latest Marathi News)

गेल्या सात दिवसात अकरा वाडे कोसळले आहे. तर, सोमवारी त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. रविवार कारंजा परिसरातील गोसावी गाड्याच लागून असलेल्या वाड्याचा काही भाग कोसळण्याची घटना घडली आहे.

गुरुवारी (ता. ७) गाडगे महाराज मठ येथील जुन्या वाड्याच्या घरास असलेली संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटनेपासून वाडे कोसळण्याच्या घटनांना सुरवात झाली.

त्यानंतर बडी दर्गा परिसरातील वाड्याची गॅलरी कोसळणे, चौक मंडई रस्त्यावरील धोकादायक वाड्याच्या घराची भिंत कोसळणे, चौक मंडई येथील वाड्याचा अर्धा भाग कोसळणे त्याचप्रमाणे जुनी तांबट लेन, आसराची वेस या ठिकाणी दोन वाडे, कानडे मारुती लेन, रविवार करांच्या शनी मंदिर येथील बाफना वाडा तसेच गाडगीळ भागातील वाडा यासह पंचवटीमध्ये एक वाडा अशा सात दिवसात ११ वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्याचप्रमाणे काझी गढीवरील तीन बंद घरांच्या भिंतीचा भाग कोसळण्याच्या घटना देखील घडल्या.

काही वेळ वाहतूक कोंडी

सोमवारी (ता. १८) विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वाडे कोसळण्याची दुसरी इनिंग सुरू झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास रविवार कारंजा मुख्य रस्त्यावर असलेल्या सुंठवाल वाड्याचा धोकादायक भाग रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली.

सुदैवाने त्या वेळी याठिकाणी कोणी नसल्याने दुर्घटना टळली. महापालिका पश्चिम विभागास माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर कोसळलेला ढिगारा बाजूला केला. त्यानंतर वाड्याचा अन्य धोकादायक भाग कर्मचाऱ्यांकडून उतरवून घेण्यात आला.

दरम्यान, धोकादायक भाग उतरवताना कुठली दुर्घटना घडू नये यासाठी काही वेळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT