11th admission esakal
नाशिक

11th Admission: अकरावी प्रवेशाची अखेरची संधी! इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

11th Admission : येथील महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्‍या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु होती. आठ प्रवेश फेऱ्या झाल्‍यानंतर ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.

अद्यापही रिक्‍त राहिलेल्‍या जागांवर प्रवेशाची अखेरची संधी सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात उपलब्‍ध केली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (11th Admission Last chance for eleventh admission Education Department invites aspirants to fill application form nashik)

इयत्ता अकरावी प्रवेशाच्‍या तीन नियमित फेऱ्या आणि पाच विशेष फेऱ्या घेण्यात आल्‍यात. नियमित विद्यार्थ्यांसोबत पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनादेखील या माध्यमातून प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध करून दिलेली होती.

पहिल्‍या काही फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी लगबग बघायला मिळाली असली तरी विशेष फेऱ्यांमध्ये प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटत गेली. त्‍यामुळे ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्‍याचे शिक्षण विभागाने सुद्धा जाहीर केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अर्ज प्रक्रिया सुरुच,‘एटीकेटी’ वाल्‍यांना संधी

आणखी काही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असतील त्यांनी प्रवेशाच्या पोर्टलवर अर्जाचा भाग एक व भाग दोन भरून ठेवण्याच्‍या सूचना शिक्षण विभागाने दिल्‍या आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

त्यांना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकरावी प्रवेशाची शेवटची संधी दिली जाणार आहे. गौरी गणपती उत्सवामुळे काही क्षेत्रांमध्ये शाळांना स्थानिक सुट्ट्या असल्यामुळे १६ ते २४ सप्टेंबरदरम्‍यान प्रवेश प्रक्रियेची कोणतीही फेरी आयोजित केलेली नाही.

पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्‍ध असेल. एटीकेटी सूत्रातील विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. त्‍यांनी सहाशेपैकी एकूण प्राप्त गुण नोंदविण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT