ITI Admission: आयटीआयला 23 हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश; शासकीयच्‍या 94 टक्‍के जागा भरल्‍या

ITI Admission
ITI Admission esakal

ITI Admission : औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) अभ्यासक्रमांना काही वर्षात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्येदेखील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

नाशिक विभागात २२ हजार ९९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्‍यातही शासकीय आयटीआयला विद्यार्थ्यांनी प्राधान्‍य दिले असून, येथील ९४.२० टक्‍के जागांवर प्रवेश निश्‍चित झालेले आहेत. (23 thousand students took admission in ITI 94 percent of government posts filled nashik)

कौशल्‍याधिष्ठीत अभ्यासक्रम म्‍हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांच्‍या ट्रेडकडे पाहिले जाते. शिक्षणानंतर बेरोजगारीच्‍या संकटाला तोंड द्यावे लागू नये, याकरिता विद्यार्थ्यांकडून हमखास रोजगाराची संधी उपलब्‍ध करून देणाऱ्या आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो आहे.

त्‍यातच नुकताच आयटीआयच्‍या प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन पाचशे रुपये केलेले असल्‍याने, विद्यार्थ्यांनी भरलेल्‍या शुल्‍कापेक्षा अधिक रक्‍कम त्‍यांना विद्यावेतनाच्‍या स्‍वरूपाने प्राप्त करून घेण्याची संधी उपलब्‍ध झाली आहे.

येत्‍या २३ सप्‍टेंबरपर्यंत दैनंदिन स्वरूपात समुपदेशन फेरी पार पडते आहे. याअंतर्गत रिक्‍त राहिलेल्‍या जागांवर आयटीआयच्‍या स्‍तरावर रोजच्‍या रोज प्राप्त अर्जांच्‍या आधारे गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश दिले जात आहे.

मुलींचे प्रमाण निम्‍यापर्यंत

काही आयटीआय हे पूर्णतः मुलींसाठी आहेत. तर इतर आयटीआयमध्ये मुलींना ३३ टक्‍के आरक्षण निर्धारित केले आहे. याशिवाय गुणवत्तेनुसार सर्वसामान्‍य जागांवरही विद्यार्थिनींना प्रवेशाची संधी उपलब्‍ध असते.

या सर्व बाबींचा विचार करता आयटीआयला प्रवेशितांमध्ये मुलींचे प्रमाण सुमारे पन्नास टक्‍यांपर्यंत जात असल्‍याचे सांगितले जाते. मुलांची मक्‍तेदारी असलेल्‍या कठीण पातळीच्‍या ट्रेड्‌समध्येही आता विद्यार्थिनी प्रवेश घेऊ लागल्‍या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ITI Admission
YCMOU Admission : ‘मुक्‍त’च्‍या प्रवेशासाठी आता 20 पर्यंत मुदत

नाशिक विभागाची स्थिती

* शासकीय आयटीआय-

- उपलब्‍ध जागा-------१५ हजार २२४

- झालेले प्रवेश---------१४ हजार ०७८

- रिक्‍त जागा----------१ हजार १४६

* खासगी आयटीआय-

- उपलब्‍ध जागा--------१५ हजार ८२०

- झालेले प्रवेश----------६ हजार ९०४

- रिक्‍त जागा---------६ हजार ९०४

ITI Admission
AYUSH Course Admission : आयुष अभ्यासक्रमांची पहिली निवड यादी उद्या होणार जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com