Corona Updates News Nashik
Corona Updates News Nashik esakal
नाशिक

Corona Update : जिल्‍ह्‍यात तब्बल 168 पॉझिटिव्‍ह, एकाचा बळी

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव चिंताजनकरीत्या वाढतो आहे. सोमवारी (ता.११) जिल्‍ह्‍यात तब्‍बल १६८ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive Cases) आले. नाशिक महापालिका (NMC) क्षेत्रात उपचार घेणाऱ्या एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला आहे. ७५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत वाढ झाली असून, हा आकडा पाचशेपार गेला आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ५१३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (168 positives in district one death Nashik Latest Corona Update News)

जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोना बळी जात नसल्‍याने काही प्रमाणात दिलासा मिळत होता. परंतु अवघ्या काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचा बळी गेल्‍यानंतर सोमवारी शहरातील एका बाधिताचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. दीर्घ कालावधीनंतर नाशिक महापालिका हद्दीतील बाधिताचा कोरोनाने मृत्‍यू झालेला आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आठ हजार ९०१ झाली आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत ८२३ अहवाल प्रलंबित होते. सर्वाधिक ६५३ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्रातील होते. तर नाशिक शहरातील ११५, मालेगावच्‍या ५५ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. सोमवारी जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर ५.७१ टक्‍के राहिला.

ग्रामीणमध्ये १०५, शहरात ३४ बाधित

सोमवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रात तब्‍बल १०५ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात ३४ पॉझिटिव्‍ह आढळले. मालेगावला आत्तापर्यंत नियंत्रणात स्‍थिती असताना, सोमवारी २१ बाधित आढळले आहेत.

जिल्‍हा बाहेरील आठ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. सक्रिय रुग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीण क्षेत्रातील २७९, नाशिक शहरातील १६८, मालेगावचे ३८, तर जिल्‍हा बाहेरील २८ बाधितांवर उपचार सुरु आहेत. सक्रिय रुग्‍णांपैकी चौघांना उपचारादरम्‍यान ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT