Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News: बस-ट्रकच्या धडकेत 18 प्रवासी जखमी; कौळाणे शिवारात झाली समोरासमोर धडक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : मनमाड- मालेगाव रस्त्यावरील कौळाणे शिवारात बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पंधरा ते अठरा प्रवासी जखमी झाले.

जखमींपैकी चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (18 passengers injured in bus truck collision accident in Kaulane Shivara nashik news)

शिरपूर आगाराची शिरपूर- पुणे बस (एमएच २०, बीआर ३४५९) पुणे येथून येत होती. कौळाणे शिवारात समोरून येणाऱ्या ट्रकशी (एमएच १५, आरए ४६५९)शी या बसची समोरासमोर धडक झाली. मंगळवारी (ता. २७) रात्री हा अपघात झाला.

यात बसमधील अठराहून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णवाहिका चालक गणेश शेवाळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. अपघातात बसचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. आगारातर्फे जखमींची नोंद घेण्यात आली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT