jailed esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : 5 लाखांची लाच मागणाऱ्या सहकाराची कारागृहात रवानगी

मोबदल्यात पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील दोघांची न्यायालयाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : क्रेडिट सोसायटीच्या नियमानुसार कर्ज न भरलेल्या सभासदांचे घर लिलाव विक्रीच्या आदेशाविरोधात दाखल याचिकेचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याच्या मोबदल्यात पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील दोघांची न्यायालयाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. (2 Bribes in Cooperative Department Jail nashik crime news)

सहकार अधिकारी भीमराव ऊर्फ भूषण यशवंत जाधव (वय ४५) व सहाय्यक सहकार अधिकारी अनिल नथुजी घरडे (५२) अशी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोघा संशयित लाचखोर अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.

सोसायटी नियमानुसार सभासदांनी कर्ज न भरल्यास त्याच्या घराचा लिलाव केला जातो. या लिलाव विक्रीच्या आदेशाविरोधात तक्रारदाराने विभागीय सहनिबंधक कार्यालयात अर्ज केला असता, तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्याच्या मोबदल्यात सहकार अधिकारी भीमराव जाधव, सहाय्यक सहकार अधिकारी अनिल घरडे यांनी सहा लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत दोन्ही संशयितांनी तडजोडीअंती पाच लाखांची लाच मागितली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. ३१) रात्री मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दोघांना अटक करून न्यायालयात गुरुवारी (ता. १) हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT