Nashik Bribe Crime: राजापूरच्या मंडलाधिकाऱ्यांना 25 हजारांची लाच घेताना अटक

पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली, म्हणून राजापूर येथील मंडलाधिकारी मनोहर अनिल राठोड (वय ३३) यांना अटक करण्यात आली.
ACB personnel bringing Divisional Magistrate Manohar Rathod to the city police station.
ACB personnel bringing Divisional Magistrate Manohar Rathod to the city police station.esakal

येवला : सातबारा उताऱ्यावर मालकी हक्काची घेतलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी राजापूर येथील मंडलाधिकाऱ्याला २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Mandal officer of Rajapur arrested for accepting bribe of 25 thousand Nashik Crime)

पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली, म्हणून राजापूर येथील मंडलाधिकारी मनोहर अनिल राठोड (वय ३३) यांना अटक करण्यात आली.

याबाबत एसीबीने सांगितले, की तक्रारदार येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी असून, त्यांनी विकत घेतलेल्या राजापूर येथील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांनी ४ जानेवारीला मालकी हक्काबाबत नोंद घेतली होती.

ACB personnel bringing Divisional Magistrate Manohar Rathod to the city police station.
Nashik Accident Cases: वर्षभरात शहरात रस्ते अपघातांत 194 बळी; सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे

ती नोंद प्रमाणित करण्यासाठी राजापूरचे मंडलाधिकारी राठोड टाळाटाळ करीत होते. त्यांनी पैशाची मागणी केली. त्याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष २५ हजार रुपये घेतले, म्हणून त्यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपधीक्षक अनिल बडगुजर, हवालदार प्रभाकर गवळी, पोलिस नाईक संजय ठाकरे यांनी ही कारवाई केली.

ACB personnel bringing Divisional Magistrate Manohar Rathod to the city police station.
Nashik E- Challan Scam: फेक ‘इ-चलन’ मेसेजपासून सावधान! वाहतूक शाखेचा सावधगिरीचा इशारा; अशी घ्या खबरदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com