Burglary esakal
नाशिक

म्हसरूळ परिसरात 2 घरफोड्या; फ्लॅटचे लॉक तोडून ऐवज चोरीला

नरेश हाळणोर

नाशिक : म्हसरूळ परिसरातील दोन फ्लॅटचे लॉक तोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा ऐवज चोरट्यांनी चोरून (Theft) नेला आहे. जुईनगर आणि स्नेहनगरमध्ये या घरफोडीच्या (Burglary) घटना घडल्या आहेत. जुईनगरमध्ये बंद फ्लॅटचे लॉक तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून घरफोडी केली. (2 burglary cases in Mhasrul area Nashik Crime News)

लता पवार (रा. जुईनगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ) यांच्या फिर्यादीनुसार, २ जुलैला त्या कुटुंबीयांसह परगावी गेल्या होत्या. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद फ्लॅटचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील कपाटातून ६ हजार रुपयांचे सोन्याचे झुमके आणि साडेतीन हजार रुपयांची रोकड असा ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसरी घटना दिंडोरी रोडवरील स्नेहनगरमध्ये घडली. श्रीकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार, ते घरी नसताना बुधवारी (ता. ६) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि ६ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ३ हजारांचे चांदीचे जोडवी, ६ हजार रुपयांची रोकड असा १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT