साहेब, शूटिंग चालू आहे, पावती फाडा; टोइंग कर्मचाऱ्यांचा इशारावजा संदेश

towing
towing esakal

नाशिक : अशोक स्तंभ ते मेहेर सिग्नल रस्त्यालगतच्या सायकल ट्रॅकवर दुचाकी पार्क केली असता, टोइंग वाहन (Towing Vehicle) आले. कर्मचाऱ्यांनी लगेच ती दुचाकी उचलून टोइंग वाहनात ठेवत असतानाच, दुचाकीचालक आला आणि त्याने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोइंग कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने वादाचा प्रसंग उभा राहिला. त्या वेळी बघ्यापैकी काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग सुरू केल्याने गडबडलेल्या कर्मचाऱ्याने वाहतूक हवालदाराकडे पाठविले आणि, ‘साहेब, शूटिंग चालू आहे, पावती घ्या फाडून’ असा इशारावजा संदेश दिल्याने नाइलाजाने दंडाची पावती द्यावी लागली की काय, अशी चर्चा मात्र बघ्यांमध्ये होती. (Warning message from towing staff to police constable Nashik News)

वाहतूक पोलिस शाखेकडून नो- पार्किंगमधील वाहनांची टोइंग केली जात असताना, वादावादीचे प्रसंगी नेहमीच घडतात. मात्र, टोइंग करताना नियमांचे सर्रास उल्लंघन होते. असाच प्रसंग अशोक स्तंभ ते मेहेर सिग्नलदरम्यान गुरुवारी (ता. ७) दुपारी घडला. सायकल ट्रॅकवर नो पार्किंग असतानाही एका दुचाकीस्वाराने दुचाकी पार्क केली. काही वेळात टोईंग वाहन आले आणि कर्मचाऱ्यांनी दुचाकी ओढत टेम्पोत टाकली. जवळच असलेला दुचाकीचालक धावत आला. त्याने रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी त्याचे न ऐकता दुचाकी टेम्पोत ठेवली.

त्या वेळी जमलेल्या काहींनी मोबाईलमध्ये घटनेचे शूटिंग घेणे सुरू केल्याचे पाहून कर्मचारी गडबडले आणि त्यांनी दुचाकी मालकाला वाहतूक पोलिस हवालदाराकडे पाठवत पावती फाडा असा इशारावजा संदेश दिला. वाहतूक पोलिसाने दंडाची पावती दिली. परंतु, या वेळी उपस्थितांमध्ये एका वेगळ्याच चर्चेला प्रारंभ झाला. टोईंग वाहन आले तेव्हा त्याच सायकल ट्रॅकवर रिक्षा पार्क केलेली होती. काही अंतरावर तीन-चार चारचाकी वाहनेही पार्क केलेली होती. त्या ठिकाणी नो-पार्किंगचा फलक असताना, दुचाकी पार्क केली तर टोइंगची कारवाई होते मात्र, त्याच ठिकाणी रिक्षा, चारचाकी वाहने असताना त्याकडे वाहतूक शाखेकडे सोईस्कर दुर्लक्ष का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

towing
बंडानंतर नाशिकमध्ये सेनेची परिक्षा

सावजच निसटल्याची चर्चा

टोईंग वाहनात दुचाकी ठेवताना जर दुचाकीचालक आला तर बऱ्याचदा त्यालाही टोइंग वाहनात बसविले जाते. काही अंतरावर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून विनापावती दंड घेतले जातो आणि दुचाकी उतरविली जाते. मात्र, तसे काही झाले नाही. त्यातही दुचाकी मालकाने ‘दीड लाखाच्या गाडीसाठी ५०० रुपयांचा दंड मोठा नाही, गाडी उतरव’ असे म्हटल्याने टोइंग कर्मचाऱ्यांचे सावजच निसटल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

towing
शिवसेना ताब्यात घेण्याचा भाजपचा डाव : संजय राउत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com