Ganja Sellers Arrested Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : 2 लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

नरेश हाळणोर

नाशिक : डीजीपीनगर परिसरात गांजा (Ganja) बाळगणाऱ्या दोघा संशयितांनी दुचाकीसह अटक करून दोन लाख रुपये किमतीचा सव्वादहा किलो गांजा जप्त (Seized) करण्यात आला. सदरी कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिक एकच्या पथकाने केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 lakh Ganja seized 2 arrested Nashik latest Crime News)

सागर गणेश अहिरे (२३, रा. सटाणा जि. नाशिक), गणेश सुधाकर चौधरी (२४, रा. एरंडोल, जि. जळगाव), अशी संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे प्रशांत मरकड यांना संशयित गांजा घेऊन येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, डीजीपीनगर परिसरात सापळा रचला.

संशयित सागर आहिरे हा दुचाकीवरून (एमएच- १८- बीपी- ०२१५) जात होता. त्याच्यासमवेत संशयित गणेश चौधरीही होता. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ओलसर १० किलो ३०० ग्रॅम वजनाचा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा गांजा व दुचाकी हस्तगत केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त गुन्हे संजय बारकुंड, सहायक आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, निरीक्षक आँचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र बागूल, अनिल दिघोळे, किरण शिरसाट, येवाजी महाले, योगीराज गायकवाड, प्रदीप म्हसदे, सुरेश माळोदे, रामदास भडांगे, आसिफ तांबोळी, मनोज डोंगरे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, विशाल देवरे, मोतीराम चव्हाण, रावजी मगर, रोहीत आहिरे, अण्णासाहेब गुंजाळ यांनी सदरची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT