Shinde-Fadanvis Esakal
नाशिक

Youth Festival Nashik : युवा महोत्सवासाठी अधिकाऱ्यांच्या 20 समित्या; उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या २० वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Youth Festival Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या २० वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवाच्या तयारीचा मंगळवारी (ता. २) ऑनलाइन आढावा घेतला.()

नाशिकमध्ये चार दिवस विविध ठिकाणी होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील आठ हजार युवक सहभागी होणार आहेत. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत असून, मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा जाणून घेतला.

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता उपस्थित होते. पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनीही सहभाग घेतला.

नाशिकला १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्यातील युवक सहभागी होतील. महोत्सवाचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन केली आहे.

असा असेल युवा महोत्सव

- उद्‌घाटनाचा मुख्य सोहळा- तपोवन

-यंग आर्टिस्ट कॅम्प, पोस्टर मेकिंग- उदाजी महाराज म्युझियम, गंगापूर रोड

-सांघिक लोकनृत्य आणि वैयक्तिक लोकनृत्य- कालिदास कलामंदिर नाशिक

-फोटोग्राफी स्पर्धा - कालिदास कलामंदिर

-घोषणा आणि थिमॅटिक सादरीकरण - कालिदास कलामंदिर

-सांघिक व वैयक्तिक लोकगीत- रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड

-सुविचार, युवा संमेलन, सांस्कृतिक, युवा कृती, महाराष्ट्र युथ एक्स्पो, फूड फेस्टिव्हल - ठक्कर डोम मैदान

-साहसी उपक्रम : अंजनेरी, ठक्कर डोम, केटीएचएम बोटक्लब, चामर लेणी

-समारोप : विभागीय क्रीडा संकुल पंचवटी

-पारंपारिक कला प्रकार : नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT