Youth Festival : युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी आज अखेरचा दिवस; अशी करा नोंदणी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youth festival

Youth Festival : युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी आज अखेरचा दिवस; अशी करा नोंदणी..

जळगाव : स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मूल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय युवा (Youth) उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (District Level Youth Festival organized by Nehru Yuva Kendra today is last day to participate jalgaon news)

या उत्सवात चित्रकला कार्यशाळा-स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा-स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा-स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी होणार आहे. यात प्रवेशासाठी बुधवारी (ता. १५) अखेरचा दिवस असल्याची माहिती जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी दिली.

स्पर्धेत एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल, विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये एक हजार,

द्वितीय ७५० रुपये तर तृतीय ५०० रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये, तृतीय १ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समूहाकरीता) एका ग्रुपमध्ये कमीत कमी ५ जास्तीत जास्त २० स्पर्धक असावे. प्रथम बक्षीस ५ हजार रुपये, द्वितीय २५०० रुपये, तृतीय १२५० रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.

या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/289521GyugghSDk99 या लिंकवर १५ फेब्रुवारी, पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा. ज्या सहभागींनी अगोदर नोंदणी केलेली आहे, त्यांना नोंदणी करण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र गट नं. ४०, प्लॉट नं. ६०, द्रौपदी नगर, जळगाव-फोन नं. ०२५७- २९५ १७५४ ईमेल: qnykjalgaon@gmail.com वर संपर्क साधावा

टॅग्स :JalgaonYouthFestivals