Liquor esakal
नाशिक

भद्रकाली पोलिसांकडून 2 हजाराचा मद्यसाठा जप्त

- युनूस शेख

जुने नाशिक : भद्रकाली पोलिसांकडून सुमारे २ हजार ३८० रुपयांचा दारू साठा (liquor Stock) जप्त (Seized) करण्यात येऊन एका संशयितास ताब्यात घेतले आहे. नवाज रशीद सय्यद (५२, रा. जुने नाशिक), असे संशयिताचे नाव आहे. (2000 worth liquor seized from Bhadrakali police Nashik Crime News)

मंगळवारी (ता. ७) पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर व कर्मचारी नानावली भागात गस्त करत होते. द्वारका चौकास लागून असलेल्या मोकळ्या मैदानावर एक जण अवैधरीत्या मद्य विक्री करत असल्याची माहिती श्री. ठाकूर यांना मिळाली. कर्मचाऱ्यांसह ते घटनास्थळी दाखल झाले. एक जण दारू विक्री करत असल्याचे आढळून आला. पोलिसांनी नवाज सय्यद यास ताब्यात घेत चौकशी केली. त्याच्याकडून ३६० रुपयांच्या रोख रकमेसह २ हजार ३८० मद्य साठा जप्त केला. दरम्यान, रेकॉर्डवरील सराईत ९ संशयितांची तपासणी केली. २ गुन्हेगारांची, हिस्टरी सीटर ५, १३ तडीपारांची तपासणी करण्यात आली. तर १० टवाळखोरांवर कारवाई करत ८ जणांना समन्स बजावण्यात आले. याशिवाय वेळेवर आस्थापना बंद न केल्याप्रकरणी आठ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT