Nashik : ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ ॲपमुळे 24 तास सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Post Payments Bank

Nashik : ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ ॲपमुळे 24 तास सेवा

नाशिक : पोस्ट विभागामार्फत (Indian Post) ग्राहकांच्या सेवेसाठी ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ ॲप (App) सेवा सुरू करण्यात आले असून, या ॲपच्या माध्यमातून पीएलआय (PLI) आणि आरपीएलआयचे (RPLI) दरमहा हप्ते ऑनलाइन स्वरूपात भरता येणार आहे. (India Post Payment Bank app Nashik News)

हेही वाचा: ZP गट गण प्रारूप रचनेवर हरकतींचा पाऊस; एकूण 93 हरकती

ग्राहकांसाठी २४ तास ही सेवा उपलब्ध असल्याने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले. सेवेचा लाभ घेण्यासाठी आयपीपीबी खाते असणे आवश्यक असून, ॲप आपल्या मोबाईलवर सुरू करण्यासाठी ग्राहकांनी जवळच्या पोस्ट कार्यालय, शाखा किंवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधावा. खाते उघडल्यानंतर आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग ॲप डाऊनलोड करावे. त्यातील पोस्ट ऑफिस सर्व्हिस या ऑप्शनमध्ये पोस्ट लाइफ इन्शुरन्स या पर्यायाच्या माध्यमातून ग्राहकांना घरी बसून काही मिनिटांतच भरणा करता येणार आहे. ॲपच्या माध्यमातून स्टॅण्डींग इन्स्ट्रक्शनद्वारे आपल्या प्रीमियमचा भरणा, तसेच ऑटो कटिंगदेखील करता येणार आहे. याबरोबरच आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आदींचाही भरणा करता येणार आहे.

हेही वाचा: Nashik : पैसे परत न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या उताऱ्यावर चढणार बोझा

Web Title: India Post Payment Bank App Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top