elephantiasis  Google
नाशिक

नाशिक विभागात २७८ हत्तीरोग रुग्ण; ३१ ऑगस्टपर्यंत दुरीकरण मोहीम

प्रशांत कोतकर


नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या उद्दिष्टानुसार राज्यातून २०२१ मध्ये हत्तीरोग दुरीकरणाचे ध्येय आरोग्य विभागाने ठेवले आहे. या साठी १६ ऑगस्टपासून नाशिक विभागात विशेष दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मोहीम ३१ ऑगस्टपर्यंत चालणार असून विभागात सद्यःस्थितीला २७८ रुग्णांची नोंद असल्याची माहिती नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ यांनी ‘सकाळ’ ला दिली.


डॉ. गांडाळ यांनी सांगितले की, दुरीकरणासंबंधीची कार्यवाही प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागात जिल्हानिहाय हत्तीरोग बाह्यलक्षणेयुक्त व अंडवृद्धी रुग्णांची लाइन लिस्ट सादर करण्याची सूचना केली आहे. त्यात नवीन हत्तीरोग/अंडवृद्धी रुग्णांची नोंद केली जात आहे. हत्तीरोगाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना मोफत डीईसी गोळ्या, व्यंगोपचारासंदर्भात मार्गदर्शन तर अंडवृद्धी झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपील आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली जात आहे.


डासांची उत्पत्ती व उपाय
क्युलेक्स डासाची वाढ घाण पाण्यात होते. रोगाचा प्रसार टाळण्यासाठी परिसरात स्वच्छता, सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट, व्हेंटपाइपला जाळी बांधणे, साचलेल्या/सांडपाण्यात गप्पीमासे सोडावे. आरोग्य विभागाच्या गप्पी मासे पैदास केंद्रातून गप्पीमासे मोफत उपलब्ध करून दिली जातात.

हत्तीरोगाची लक्षण
हत्तीरोग जंतूचा प्रसार क्युलेक्स डासांमार्फत होतो. क्युलेक्स डासाच्या मादीने चावा घेतल्यास हा जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून पुढील दीड वर्षानंतर या रोगाची लक्षणे दिसू लागतात. त्यात हात व पायास सूज, पुरुषांमध्ये अंडवृद्धीचे लक्षण दिसून येतात.



विभागातील रुग्णांचे चित्र
९०
नाशिक

२८
धुळे

३२
नंदुरबार

८८
जळगाव

४०
अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT