Narayan Rane
Narayan RaneGoogle

नाशिक पोलिसांची राणेना नोटीस; २ सप्टेंबरला राहावे लागणार हजर

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आमच्या तपासाला सहकार्याची भूमिका आहे. जामीन मिळाल्याने अटक टळली असली तर, नाशिक मधील गुन्ह्यात जबाबासाठी येत्या गुरुवारी (ता.२) सप्टेंबरला त्यांना नाशिक पोलिसांसमोर यावे लागणार आहे. नाशिक पोलिस पथकाने तशी नोटीस त्यांना बजावली आहे. अशी माहीती पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्याच्या अनुषंगाने आज पत्रकारांशी बोलत होते. पांडे म्हणाले की, विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांचे पोलिसांना सहकार्य आहे. पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलिस पथक गेले होते. हे पथक संगमेश्वरला पोहचले असतांना त्यांना समजले की, राणे यांनारायगड पोलीस घेऊन गेले होते. त्यामुळे तेथील कारवाईबाबत सुनावणी सुरु झाली. न्यायालयात नाशिक पोलिसांनी भूमिका मांडून २ सप्टेंबरला हजर राहण्याचे विनंती केली. त्यानुसारत्यांनी यायचे आहे. २ सप्टेंबरला हजर राहण्याचे विनंती केली. मंत्री महोदयांच्या सहकार्याची भूमिका असल्याने आम्ही त्याचा आदर करतो. मी कायद्याला धरून नोटीस काढली आहे. रायगड पोलिसांची न्यायालयीन कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. न्यायालयात नाशिक पोलिसांनी भूमिका मांडली. श्री राणे यांनीही पोलिस तपासाला सहकार्य केले. त्यांना दिलेल्या नोटीसवर त्यांनी सही देखील केली आहे. त्यांचे तपासाला सहकार्य करीत असल्याने आम्ही समाधानी आहोत. नाशिकमध्ये तक्रार दाखल झाली म्हणूनच गुन्हा दाखल करण्यात आला.

Narayan Rane
...म्हणून नाशिक पोलिसांनी राणेंना अटक केली नाही, आयुक्तांनी सांगितलं कारण

अनुचित प्रकार टाळण्यासाठीच…

राज्य घटनेत कायद्याचे राज्य आहे असे म्हटले आहे. व्यक्तीपेक्षा कायदा मोठा आहे. त्यामुळे मी काही विशेष केले नाही, जे काही कायद्यात आहे. त्याची नियमानुसार अंमलबजावणी केली आहे. पोलीस विभाग हा कायद्याचे संरक्षण करण्यासाठीआणि योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस विभाग आहे. मी त्याचाच अवलंब मी करत आहे. पोलिस कारवाईचा हेतू एवढंच होता की, दोन संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या विषयानुसार भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी अटक करत होतो. पण त्यांनी न्यायालयात पुन्हा असे होणार नाही असे कोर्टात सांगितले आहे. विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांना खूप ज्ञान आहे माझं अल्प ज्ञान आहे; त्यानुसार मी कायद्याला धरून नोटीस काढली आहे. मंत्री महोदय २२६,२२७ खाली ते आदेश खारीज करू शकतात.मात्र मी पण माझ्या आदेशावर ठाम आहे. मंत्रीमहोदयांना बोलावले आहे.

Narayan Rane
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील साठ्यात एक टक्क्याने वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com