Criminal Arrested esakal
नाशिक

Nashik : भद्रकाली पोलिसांकडून 3 किलो भांग जप्त

- युनूस शेख

जुने नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून १ हजार ४०० रुपयांची सुमारे २ किलो ८०० ग्रॅम भांग (Cannabis) जप्त (Seized) करून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांना तलावडी परिसरात एक जण अवैधरीत्या (Illegal selling) भांग विक्री करत असल्याची माहिती मिळाली. (3 kg illegal Bhang seized from Bhadrakali police Nashik crime News)

त्यांनी गुन्हे शोध पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस कर्मचारी रमेश कोळी, सागर निकुंभ, धनंजय हासे, लक्ष्मण ठेपणे आदी घटनास्थळी दाखल झाले. भद्रकाली परिसरातील वीज वितरण कार्यालयाच्या मागील बाजूस संशयित स्वप्नील मधुकर मोरे (२८, रा. आंबेडकर नगर, पुणे रोड) अवैधरीत्या भांग विक्री करताना आढळून आला. पथकाने त्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ किलो ८०० ग्रॅम भांग हस्तगत केली. त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, रात्री करण्यात आलेल्या विशेष तपासणीत अवैध दारू विक्री प्रकरणी १ कारवाई करण्यात आली. अवैद्य हत्यार प्रतिबंधक कारवाई ४, पाहिजे असलेल्या ७ संशयितांची तपासणी, रेकॉर्डवरील सराईत ५ संशयितांची तर हिस्टरी सीटर ५, १२ तडीपारांची तपासणी करण्यात आली. तर , ३ टवाळखोरांवर कारवाई करत ६ जणांना समन्स बजावण्यात आले. याशिवाय वेळेवर आस्थापना बंद न केल्याप्रकरणी ११ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT