पाणीपट्टी ॲपची महापालिकेकडून चाचणी; घरबसल्‍या मिळणार पाणीपट्टी

water bill
water bill esakal

नाशिक : महापालिकेच्‍या पाणीपट्टी विभागातील (NMC water bill department) तोकड्या मनुष्यबळामुळे पाणीपट्टी वाटपाचे काम पूर्ण क्षमेतेने होत नाही. दुसरीकडे कोट्यवधींची पाणीपट्टी थकीत असून, यामुळे महापालिकेचा महसुल (Revenue) बुडत असतो. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विभागाने ॲप (App) विकसित केले असून, सध्या शहरातील विविध भागात ॲपची चाचणी केली जाते आहे. यशस्‍वी चाचणीनंतर ॲपची अंमलबजावणी होणार असून, वापरकर्त्यांना घरबसल्‍या पाणीपट्टी उपलब्‍ध होण्यासह रक्‍कम ऑनलाइन स्वरूपात अदा करता येणार आहे. महापालिकेतर्फे विकसित केलेल्‍या या ॲपचे काम अंतिम टप्यांत असून, विविध भागांमध्ये नागरिकांच्या घरी जाऊन चाचणी सध्या सुरु आहे. ॲप वापरताना नेमक्‍या कुठल्‍या तांत्रिक अडचणी येतात, याचा अंदाज यानिमित्त घेतला जातो आहे. या त्रूटी दूर करताना हे ॲप पूर्ण क्षमेतेने उपलब्‍ध करून दिले जाणार आहे. (NMC tests Water Bill app Nashik News)

अशी असेल प्रक्रिया...

दर चार महिन्यांनी नागरिकांना ठराविक मुदत देऊन रीडिंग मागविली जाणार आहे. या ॲपद्वारे नागरिक पाणी मीटरचे छायाचित्र काढून या ॲपवर अपलोड करू शकतील. छायाचित्राची नियंत्रण कक्षामार्फत तपासणी केल्‍यानंतर ग्राहकांना त्‍यांच्‍या व्हाटसअप क्रमांकावर एक तासात बिल पाठवले जाईल. महापालिका कर्मचारीदेखील प्रत्‍यक्षस्‍थळी जाऊन उलट पडताळणी करू शकतील.

water bill
जिल्‍ह्‍यात 19 पॉझिटिव्‍ह; पुन्‍हा ओलांडला पन्नासचा आकडा

ग्राहकांना पडताळणीचे आवाहन

मीटर बंद असणे, मीटर योग्य जागेवर नसणे, आणि मीटर जागेवरच उपलब्‍ध नसणे अशा स्वरूपाच्या अडचणी उद्भवण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर याबाबींची पडताळणी करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. ॲप कार्यान्‍वित झाल्‍यानंतर गैरप्रकार आढळल्‍यास ग्राहकांना एक पटीने दंड आकारणी केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे दोन लाख बारा हजार नळजोडण्या आहेत. पाणीपट्टी विभागाला साडे तीनशे कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असताना अवघ्या ९६ कर्मचाऱ्यांवर कामकाजाची धुरा आहे. यामुळे कामकाज प्रभावित होत असताना कामात सुलभता आणताना महसुल वाढविण्यासाठी ॲप प्रभावी ठरणार आहे.

water bill
पहिल्याच पावसात शहरात काळोख; वीज वितरण विभागाच्या कामाचे धिंडवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com