A bird friend treating a bird injured by nylon netting esakal
नाशिक

Nashik News : नायलॉन मांजामुळे जखमी 30 ‘पक्षी रेस्क्यू’; वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीची कामगिरी

नाशिक शहरात मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची प्रथा आहे. मात्र या खेळामुळे व यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे शहरात अनेक पक्षी जखमी झाले. तर त्यातील काहींना जीव गमवावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक शहरात मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची प्रथा आहे. मात्र या खेळामुळे व यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे शहरात अनेक पक्षी जखमी झाले. तर त्यातील काहींना जीव गमवावा लागला.

वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटी या संस्थेतर्फे तीसपेक्षा जास्त जखमी व अडकलेले पक्षी रेस्क्यू करीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. (30 injured bird rescue due to nylon manja on makar sankranti in city nashik news)

वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य ऋषिकेश कांबळे, सत्यजित अहिरे, गिरीश ठाकरे, संकेत शेलार, विशाल बाफना, ऋषभ बंदरे, दर्शन साळुंखे, प्रतीक कांबळे, ओम बंद्रे यांच्या टीम ने शहरात पक्षी वाचवा अभियान राबविले. कुठेही पक्षी जखमी झाल्यास संपर्क क्रमांक जाहीर केले. यावेळी अनेक जागृत नागरिकांनी या संस्थेला जखमी व झाडावर तसेच इतर ठिकाणी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन अडकलेल्या पक्षांची माहिती दिली.

या संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी पोचत शहरातील ३० पेक्षा जास्त पक्षांचे रेस्क्यू केले. यात १८ पक्षी मृत झाले, तर काहींवर उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या संस्थेचे पक्षी वाचविण्याचे काम सुरूच होते. त्यांच्या या कामाचे नाशिककरांनी स्वागत केले आहे. शहरात नायलॉन मांजाला बंदी असताना संक्रांतीच्या दिवशी सर्रास पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून आले.

याच मांजामुळे अनेक पक्षी जखमी झाले. असे असताना हा मांजा नक्की आला कुठून, याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अशी शहरात मांजाची विक्री व खरेदी झाली असेल तर हे पोलिस व महापालिकेचे अपयश असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

''नायलॉन मांजामुळे पक्षी व काही नागरिकांचाही बळी गेला आहे. या मांजावर बंदी असतानाही तो वापरला जातो. आम्ही आज पक्ष्यांच्या वेदना बघताना गहिवरलो आहोत.''- ऋषिकेश कांबळे, अध्यक्ष, वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT