Corona esakal
नाशिक

Corona Updates : दिवसभरात 47 पॉझिटिव्‍ह; 210 बाधितांवर उपचार सुरु

अरूण मलाणी

नाशिक : जिल्ह्या‍‍त नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांच्या (Corona patients) संख्येत चिंताजनकरीत्या वाढ होत आहे. मंगळवारी (ता.२१) जिल्ह्या‍‍त ४७ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive) आले. पंधरा रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ३२ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या २१० झाली आहे. कोरोनाच्‍या तिसरी लाट ओसरल्‍यानंतर प्रथमच सक्रिय रुग्‍ण संख्येचा आकडा दोनशेपार गेला आहे. (47 corona positive throughout day Nashik corona update News)

नाशिक महापालिका क्षेत्रात आढळणाऱ्या बाधितांच्‍या संख्येत होणारी वाढ शहरवासीयांसाठी चिंता वाढविणारी ठरू शकते. मंगळवारी या क्षेत्रात ३८ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. नाशिक ग्रामीणमधील सात, तर जिल्‍हा बाहेरील दोन रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळून आला नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर ३.१० टक्‍के राहिला. तर नाशिक महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्‍हीटी दर वाढून ६.३८ टक्‍के झाला आहे.

प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत पुन्‍हा वाढ झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ७३५ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. नाशिक ग्रामीणमधील ५४४, नाशिक शहरातील १३७, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ५४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. सध्या उपचार घेत असलेल्‍या सक्रिय रुग्‍णांपैकी तीन बाधितांना उपचारादरम्‍यान ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासत आहे. ४२ बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली आहेत.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येची स्‍थिती-

नाशिक महापालिका---------१३७

नाशिक ग्रामीण--------------६५

मालेगाव महापालिका--------१

जिल्‍हा बाहेरील-------------७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT