Student School Nutrition  esakal
नाशिक

School Nutrition Scheme : महागाईत खिचडीला किरकोळ दरवाढीची फोडणी

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अर्थात शालेय पोषण आहार योजनेतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना खिचडी शिजविण्याच्या दरात प्रति विद्यार्थी दरामध्ये ९.६ टक्के वाढ करण्यात आली आहे. एकीकडे महागाई गगनाला भिडली असून मिळणाऱ्या अनुदानात खर्च करताना कसरत होत असताना प्राथमिकसाठी ४८ तर उच्च प्राथमिकसाठी ७२ पैशांची किरकोळ स्वरूपाची दरवाढ करण्यात आली आहे. (48 paise for primary and 72 paise for upper primary price increase in school nutrition diet Nashik News)

पोषण आहार योजनेला ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आहार शिजविण्यासाठी लागणारे गॅस, किराणा तसेच भाजीपाला दरवाढ ही कितीतरी रुपयात होत आहे. मात्र शासनाने आहार शिजविण्यासाठी व इतर खर्च पैशात वाढवला आहे. शालेय पोषण आहार शिजवून देताना कशी जुळवाजुळव करावी लागते हे बचत गट व शिक्षकास माहीत.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तर सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक व २० ग्रॅम युक्त आहार देण्यात येतो. केंद्र शासनाकडून योजनेतंर्गत प्रती दिन, प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम तर उच्च प्राथमिक वर्गासाठी दिन १५० ग्रॅम तांदूळ पुरविला जातो.

केंद्र शासनाने २०१९ मध्ये ५.३५ टक्के, मागील वर्षी १०.९९ टक्के तर या वर्षी ९.६ टक्केच वाढ झाली आहे. या अनुषंगाने पहिली ते पाचवी म्हणजेच प्राथमिक गटासाठी ४८ पैसे व उच्च प्राथमिक गटासाठी ७२ पैसे प्रती दिन प्रती लाभार्थी अशी दरवाढ झाली आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याला ५ रुपये ४५ पैसे तर सहावी ते आठवीसाठी प्रत्येक दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याला ८ रुपये १७ पैसे अनुदान मिळणार आहे. ही दरवाढ एक ऑक्टोबर पासून लागू झाली आहे.

असा करता येईल खर्च

ग्रामीण भागात शाळांना तांदूळ व त्यासाठी लागणारा इतर धान्य मालाचा पुरवठा केला जातो.तर प्रतीदिन साठी तरतूद केलेल्या खर्चातून प्राथमिक गटासाठी ३ रुपये ३७ पैसे धान्य आदी माल पुरविण्यासाठी तर २ रुपये ८ पैसे इंधन आणि भाजी पाल्यावर खर्च करता येतील. तर उच्च प्राथमिक गटासाठी ५ रुपये ६ पैसे धान्यादी माल पुरविण्यासाठी तर ३ रुपये ११ पैसे इंधन आणि भाजीपाला वर खर्च करता येणार आहे.

शहरी भागात स्वयंसेवी सेवा, बचत गट यांच्यामार्फत तयार आहाराचा पुरवठा केला जातो. यासाठी केंद्रीय स्वयंपाक गृहाचा वापर होतो. त्यामुळे प्राथमिक गगटासाठीचे ५ रुपये ४५ पैसे व उच्च प्राथमिक गटासाठीचे ८ रुपये १७ पैसे आहार तयार करणाऱ्या यंत्रणेला देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT