Latest Crime News | काम देण्याच्या बहाण्याने 47 लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud Crime News

Nashik Crime News : काम देण्याच्या बहाण्याने 47 लाखांची फसवणूक

नाशिक रोड : उपकंत्राटदार म्हणून काम देण्याची लालूच दाखवत नाशिक रोडच्या एकाची ४७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू बबन काकड (रा. प्रभा आनंद संकुल, धोंगडे मळा), असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांनी आपल्या आर्थिक फसवणूकीबाबत कोर्टात दावा दाखल केला होता. (47 lakh fraud on pretext of job Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik : पोलिस निरीक्षक कदमांच्या आत्महत्त्येचे गूढ कायम

कोर्टाच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेरा फार्मा सुपर स्ट्रॅक्ट एलएलपी कंपनीचे प्रतित अशित शाह, क्रितीका अशित शाह या दोघा संशयितांनी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पुण्यातील रुबी रुग्णालयाशेजारील मिलियम स्टार बिल्डींगमध्ये राजीव काकड यांना टाटा कंपनीचे ५५ कोटी ५८ लाख ४७, ४५१ रुपयांचे कंत्राट भेटले आहे, असे सांगून बनावट कागदपत्र दाखवून काकड यांचा विश्वास संपादन केला.

काकड यांना उपकंत्राटदार म्हणून काम देण्यासाठी ६३ लाख ४० हजार रुपये घेतले. काही दिवसांनी त्यापैकी १६ लाख परत केले. मात्र, ४७ लाख ४० हजार रुपये परत दिले नाही. त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा पुण्यात घडल्याने तेथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.

हेही वाचा: PFI Case : Social Mediaवर चिथावणी अन्‌ सांकेतिक भाषा