Died Child esakal
नाशिक

Nashik News : चांदवड येथील 5 वर्षांच्या चिमुरडीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील निमोण येथील सेजल सोमनाथ जाधव (वय ५) ही चिमुरडी हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे. निमोण मनमाड रस्त्यालगत शेतात राहणा-या भिकाजी जाधव यांची नात शेजल सोमनाथ जाधव ही सकाळी तीचे मतीमंद आई वडील आपल्या कामात मग्न असताना ती घराच्या पाठीमागे प्रातविधीसाठी गेली होती.

त्याचवेळी हिंस्त्र प्राण्याच्या झुंडीने तीच्यावर हल्ला केला. सेजलच्या शरीराचे लचके तोडत तीला घरापासून काही अंतरावर शेतात ओढत नेत ठार केले. ती बराच वेळ झाला म्हणून घरी परत आली नाही म्हणून तीच्या कुटुंबियांनी तीचा शोध घेतला असता ती मृत अवस्थेत आढळली. (5 year old girl from Chandwad died in leopard attack Nashik News)

या घटनेने संपूर्ण निमोण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी घटनास्थळी वनपाल भाऊसाहेब सोमवंशी, वनरक्षक खंदारे, तलाठी सौरभ पिसोळकर, पोलीस पाटील हिरामण देवरे आदींनी पाहणी केली. या घटनेमुळे निमोण ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

निमोण परीसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचाही वावर आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये अधिकच भितीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ वनहद्दी लगत वावर असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच डॉ स्वाती भाऊराव देवरे, उपसरपंच हनुमान दखणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पंकज दखणे, प्रविण बोडके आदींनी केली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

भविष्यातील आधारच काळाने हिरावला

मृत शेजल आई वडीलांची अत्यंत लाडकी होती . अत्यंत गरीब असलेल्या या जाधव कुटुंबातील शेजलचे वडील सोमनाथ जाधव हे मतीमंद आहे. तर आई देखील मतीमंद आहे.

मतीमंद असलेल्या आई वडिलांचा तीच्या रुपाने भविष्यातील आधारच आज काळाने हिरावला आहे. या दुर्देवी घटनेने जाधव कुटुंब पुर्णपणे हतबल झाले आहे. मृत शेजलच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळायला हवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT