Jalgaon Crime News : वडनगरीतील कथित उच्च वर्णीयांविरुद्ध Atrocity दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : वडनगरीतील कथित उच्च वर्णीयांविरुद्ध Atrocity दाखल

जळगाव : वडनगरी (ता. जळगाव) येथे महिलांना गटारीजवळ बसवून जाणून बुजून उष्टे अन्न खायला दिले, याचा जाब विचारला असता, संबंधितांनी जातिवाचक शिवीगाळ करून महिलेसह तिच्या मुलांना मारहाण केली होती. (woman children were beaten with caste abuse Atrocities act Filed against higher caste people jalgaon crime news)

या घटनेप्रकरणी तब्बल तीन महिन्यांनंतर सोमवारी (ता. २३) पाच जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. वडनगरी येथे १ ऑक्टोबर २०२२ ला दुर्गोत्सवानिमित्त भंडारा होता. मंगला गायकवाड व अनिता पवार त्याठिकाणी गेल्या होत्या.

त्यांना गटारीजवळ बसवून संबंधितांनी जाणून बुजून उष्टे अन्न खायला दिले, याचा जाब विचारला असता, भुवन पाटील व नंदलाल पाटील यांनी जातिवाचक शिवीगाळ करत गावात राहू देणार नाही, घर पेटवून टाकू, अशी धमकी दिली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Online Job Fair : 30, 31 जानेवारीला ऑनलाइन रोजगार मेळावा

मृणाल पाटील, जयेश पाटील यांनी लाकडी दांडक्याने मंगला गायकवाड व अनिता पवार यांना मारहाण केली, तर नंदलाल पाटील, भिका पाटील यांनी मंगला गायकवाड यांचा मुलगा दीपक व शंकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी सोमवारी मंगला गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुवन पाटील, नंदलाल पाटील, भिका पाटील, जयेश पाटील, मृणाल पाटील यांच्याविरोधात ॲट्रासिटीसह दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप गावित तपास करीत आहेत.

काळीमा फासणारी घटना

वडनगरी येथील घटनेतून पुन्हा एकदा अमानवीय अत्याचाराची घटना समोर आली असून, माणुसकी आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Cyber Crime : ऑटो डिलरच्या खात्यातून साडेतीन लाख लंपास