fraud crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांची 55 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : सहा महिन्यांत रक्कम दामदुपट करून देण्याचे आमिष देत मुंबईतील एका दांपत्याने नाशिकमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष वैभव यादवराव देवरे यांची तब्बल ५५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (55 lakh fraud of NCP former district president nashik crime news)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी बारकू गवळी आणि रुची रवी गवळी ( दोघे रा. रूम नं.२००५, २० व माळा, डीकाय सोलस, फेरबंदर, घोडपदेव, मुंबई ३३) यांनी देवरे यांना २ जुलै २०२२ ते १३ जुलै २०२३ दरम्यान रकमेच्या गुंतवणुकीवर सहा महिन्यांत दामदुपट परतावा देण्याचे आमिष देवून ५५ लाख २५ हजार रुपये गुंतवायला सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र अपेक्षित मोबदला मिळाला नाही. देवरे यांनी वेळोवेळी गवळी दांपत्याचा पैशासाठी पाठपुरावा केला.

मात्र त्यांना कुठलीही रक्कम परत न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गवळी दांपत्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल, थोड्याच वेळात महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT