corona e sakal
नाशिक

कोरोनामुळे मृत्यूचा नाशिक जिल्ह्यात पुन्हा विस्फोट!

अरुण मलानी

नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असताना, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूचे सत्र अद्याप सुरूच आहे. शनिवारी (ता. २२) कोरोना मृत्‍यूचा पुन्‍हा एकदा विस्‍फोट झाला

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असताना, कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्‍यूचे सत्र अद्याप सुरूच आहे. शनिवारी (ता. २२) कोरोना मृत्‍यूचा पुन्‍हा एकदा विस्‍फोट झाला असून, जिल्ह्यात दिवसभरात ५८ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. चौथ्यांदा दिवसभरातील मृतांची संख्या पन्नासपेक्षा अधिक राहिली. दरम्यान, सर्वाधिक ३९ मृत्‍यू ग्रामीण भागात झाले असून, यात येवला तालुक्‍यातील आठ मृतांचा समावेश आहे. (58 corona patients died in a day in nashik district)

जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही आटोक्‍याबाहेर आहे. शनिवारी झालेल्‍या ५८ मृ‍त्यूमध्ये नाशिक शहरातील अठरा, नाशिक ग्रामीणमधील ३९, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील एका मृताचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक आठ मृत्यू येवला तालुक्‍यातील, तर निफाड तालुक्‍यातील सहा, दिंडोरी तालुक्‍यातील पाच, मालेगाव ग्रामीणमधील चार मृतांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्‍वर, नांदगाव तालुक्‍यांतील प्रत्‍येकी तीन, नाशिक तालुक्‍यात दोन, तर सिन्नर, सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.

दरम्‍यान, शनिवारी दिवसभरात एक हजार २२२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यात नाशिक शहरातील ४५६, नाशिक ग्रामीणमधील ७२६, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील चाळीस मृतांचा समावेश आहे. एक हजार ३१९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून, नाशिक शहरात ७५८, नाशिक ग्रामीणमध्ये ५१२, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात ४९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले.

सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार ५२९ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. यात नाशिक ग्रामीणमधील तीन हजार १२५, नाशिक शहरातील एक हजार २६१, तर मालेगावच्‍या १४३ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार ६५ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार ९२८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात एक, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात रुग्‍ण, तर नाशिक ग्रामीणमध्ये १०८ व मालेगावमध्ये २१ रुग्‍ण दाखल झाले आहेत.

यापूर्वीचे पन्नासपेक्षा जास्त मृत्यू

तारीख मृतांची संख्या

२० एप्रिल ५७

२१ एप्रिल ९०

२२ एप्रिल ५५

(58 corona patients died in a day in nashik district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT