लॉकडाउनमुळे जिल्ह्यात १९०० विद्यार्थी शालाबाह्य; महापालिका हद्दीत सर्वाधिक संख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 school

शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून शिक्षण हक्क कायद्याची अमलात आणला जात असला तरी गेल्या महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यामध्ये सहा ते १४ वयोगटातील १८६७ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेले आहे.

लॉकडाउनमुळे नाशिक जिल्ह्यात १९०० विद्यार्थी शालाबाह्य

नाशिक : शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून शिक्षण हक्क कायद्याची अमलात आणला जात असला तरी गेल्या महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यामध्ये सहा ते १४ वयोगटातील १८६७ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेले आहे. लॉकडाउनमुळे या विद्यार्थ्यांचे स्थलांतरण झाल्याचा अंदाज असून विद्यार्थी ज्या भागात गेले असतील तेथे शैक्षणिक प्रवेश घेतला तर ठीक अन्यथा शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शालाबाह्य मुलांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी नाशिक महापालिका हद्दीतील असून त्यांची संख्या ५५६ नोंदविण्यात आली आहे. (19 hundred students out of school in Nashik district due to lockdown)

जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून करण्यात आले. त्यामध्ये १८६७ मुले शालाबाह्य असल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाउनपूर्वी कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. लॉकडाउन होण्याच्या शक्यतेने व रोजगाराला संधी नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यामुळे शालाबाह्य मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. मागील वर्षी हजेरी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार शालाबाह्य विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर आली आहे. सहा ते चौदा वयोगटातील कधीच शाळेत न गेलेले ८५७ तर शालाबाह्य १०१०, असे एकूण १८६७ विद्यार्थी शालाबाह्य आढळून आले आहेत.

हेही वाचा: नाशिक जिल्‍ह्यात 73 दिवसांनंतर 1 हजाराच्‍या आत पॉझिटिव्‍ह

रोजगार गेल्याने स्थलांतर

नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीमध्ये शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेल्याने स्थलांतर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक महापालिका हद्दीमध्ये ५५६ तर मालेगाव महापालिका हद्दीमध्ये २८२ विद्यार्थी शालाबाह्य आढळले. नाशिक तालुक्यात १५९ ही सर्वाधिक संख्या आहे. लॉकडाउन संपुष्टात आल्यानंतर विद्यार्थी पुन्हा पूर्वीच्या जागेवर परतल्यानंतर पुन्हा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर संख्या कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी न परतल्यास शालाबाह्य विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तालुकानिहाय शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या

तालुका शालाबाह्य मुले

बागलाण ४३

चांदवड ७२

देवळा ०४

दिंडोरी १३

इगतपुरी ४१

कळवण ३४

मालेगाव ०३

नांदगाव २०

नाशिक १५९

निफाड ६५

पेठ २०

सिन्नर ०९

सुरगाणा ४९७

त्र्यंबकेश्‍वर ०६

येवला ४४

महापालिका नाशिक ५५६

मालेगाव महापालिका २८१

----------------------------------

एकूण १८६७

(19 hundred students out of school in Nashik district due to lockdown)

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्युकोरमायकोसिस'चे इंजेक्शन मिळेना

loading image
go to top