crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : तडीपाराला गावठी कट्ट्यासह, 6 हल्लेखोरांना अटक

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी तडीपार संशयिताला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी तडीपार संशयिताला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली.

तसेच सिन्नर फाटा येथे जुने वादातून दोन जणांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. (6 attackers arrested including Gavthi Katta by police nashik crime news)

मयूर अनिल जानराव (२१, रा. कैलासजी सोसायटी, जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला एक गावठी बनावटीचा लोखंडी क‌ट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले. संशयितास उपनगर पोलिस ठाणे हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे. तसेच

सिन्नर फाटा हद्दीत शोध घेत असताना संशयित राजिक युनूस शेख (१९), आकाश ऊर्फ निखिल राजेंद्र घोडेराव, अमन जाहिद शेख, सोहेल फिरोज शेख बन्या ऊर्फ निरंक नागू नरोटे, इम्रान अफसर शेख हे मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

हुसेन फिरोज शेख याच्यावर नाशिक रोड व उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, जबरी चोरी, खंडणी, दरोडा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णू गोसावी, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण गाडेकर, संतोष पिंगळ, यशराज पोतन, भाऊसाहेब नागरे, सागर आडणे, कल्पेश जाधव, गोकुळ कासार, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT