Samruddhi Mahamarg Driving esakal
नाशिक

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातातील नाशिकच्या 13 मृतांना 'इतक्या' लाखांची मदत मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Samruddhi Mahamarg Accident: मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गावर १४ ऑक्टोबरला झालेल्या अपघातात नाशिक जिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू, तर २२ जण जखमी झाले होते.

जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासनाने केला. मृतांच्या वारसांना आता शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर केले. (Accident on Samruddhi Highway 65 lakh aid to 13 death of Nashik news)

त्यानुसार जिल्हा महसूल प्रशासनाला ६५ लाखांचा मदतनिधीही प्राप्त झाला आहे. हे पैसे मृतांच्या वारसांची ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यावर दोन दिवसांत वर्ग केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा (शिर्डी-नागपूर) द्रुतगती महामार्गावर १४ ऑक्टोबरला मध्यरात्री मोठा अपघात होउन त्यात सहा वर्षांच्या चिमुरड्यासह नाशिक जिल्ह्यातील १३ जण जागीच ठार झाले होते. बुलढाण्याहून नाशिकला येणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली.

अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू, तर २२ जण जखमी झाले होते. दरम्यान, या अपघातातील जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासनाने केला असून, ठार झालेल्या मृतांच्या वारसांना आता शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर केले. हे पैसे मृतांच्या वारसांची ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यावर दोन दिवसांत वर्ग केले जाणार आहेत.

मृतांची नावे अशी

तनुश्री लखन सोळसे (वय ५, रा. नाशिक), संगीता विलास अस्वले (४०, रा. वनसगाव, ता. निफाड), अंजाबाई रमेश जगताप (३८, रा. नाशिक), रतन जमदाडे (४५), काजल लखन सोळसे (३२, रा. नाशिक), रजनी गौतम तपासे (३२, रा. नाशिक), औसाबाई आनंद शिरसाठ (७०, रा. निफाड), झुंबर काशीनाथ गांगुर्डे (५८, रा. नाशिक), अमोल झुंबर गांगुर्डे (१८, रा. नाशिक), सारिका झुंबर गांगुर्डे (४०, रा. नाशिक), मिलिंद हिरामण पगारे (५०, रा. निफाड), दीपक प्रभाकर केकाण (४७, रा. पिंपळगाव), संगीता दगडू म्हस्के (६०, रा. नाशिक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT