AISF agitation in YCMOU Marathi News esakal
नाशिक

‘YCMOU’च्‍या अभ्यासक्रमाची होळी; ‘AISF’तर्फे विद्यापीठ प्रांगणात आंदोलन

अरूण मलाणी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या (Political science) परीक्षेतील प्रश्‍नांवर ऑल इंडिया स्‍टुडंट फेडरेशन (AISF) (एआयएसएफ) यांच्‍यातर्फे आक्षेप नोंदविला होता. यासंदर्भात गुरुवारी (ता.१४) मुक्‍त विद्यापीठाच्या प्रांगणात अभ्यासक्रमाची होळी करत निषेध नोंदविला. (AISF agitation on campus of YCMOU Nashik latest marathi news)

विद्यापीठातर्फे लेखी परीक्षेत शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा तसेच मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा, असे प्रश्न विचारले होते. या प्रश्‍नांना ‘एआयएसएफ’तर्फे निषेध नोंदविला होता. तसेच विद्यापीठाने माफी मागत अभ्यासक्रमातून हा भाग वगळावा, अशी मागणी संघटनेने केली होती.

संविधान विरोधी मनुस्मृती तसेच शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रद्द करावी, संबंधित अधिकाऱ्यांच निलंबन करावे, या प्रकारची संपूर्ण जबाबदारी घेत कुलगुरूंनी अभ्यासक्रमातील इतिहासद्रोही तसेच घटनाविरोधी लिखाण तत्काळ मागे घेऊन, प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी संघटनेने केली होती.

गुरुवारी संघटनेतर्फे कुलगुरू कार्यालयाबाहेर अभ्यासक्रमाची होळी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेत प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांच्यामार्फत संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलाविण्यात आल्‍याचे संघटनेने कळविले आहे.

आंदोलनानंतर अभ्यासक्रम समिती तत्काळ बरखास्त करत असल्‍याचे आश्‍वासन मिळाले असल्‍याचेही नमूद केले आहे. संघटनेच्या आग्रहानंतर डॉ. देशमुख यांनी विद्यापीठाच्या संकेतस्‍थळावर उपलब्ध असलेला हा अभ्यासक्रम तत्काळ वगळण्याचे आदेश दिले असल्‍याचेही कळविले आहे.

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग, राज्य सहसचिव भीमा पाटील, कौन्सिल सदस्य तल्हा शेख, शहराध्यक्ष जयंत विजयपुष्प, शहरसचिव प्राजक्ता कापडणे, कैवल्य चंद्रात्रे, कैफ शेख, प्रज्ञा साळवे, दीक्षा साळवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT